Tuesday, July 16, 2024
Homeमुख्य बातम्या१५ दिवसांत चमत्कार घडणार, शरद पवार भाजपसोबत येणार अन् अजितदादा...; रवी राणांचा...

१५ दिवसांत चमत्कार घडणार, शरद पवार भाजपसोबत येणार अन् अजितदादा…; रवी राणांचा मोठा दावा

मुंबई | Mumbai

- Advertisement -

आमदार रवी राणा यांनी मोठे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होणार असल्याचे वक्तव्य केले आहे. एप्रिल महिन्यात रवी राणा यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये भूकंप होईल, असं भाकित वर्तवलं होतं.

अजित पवार यांनी बंड केले होते. मागच्या दीड वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन भूकंप झाले. पहिले एकनाथ शिंदे आणि मग अजित पवार यांनी उद्धव ठाकरे शरद पवारांना जोरदार धक्के दिले, त्यानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल, असा खळबळजनक दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे..

माणुसकी ओशाळली! अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मदतीसाठी अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत दारोदार फिरली पण…

अजित पवार यांच्यानंतर शरद पवारही 15 ते 20 दिवसात मोदींच्या नेतृत्वाखालील सत्तेत सहभागी होतील, असा गौप्यस्फोट रवी राणा यांनी केला आहे. शरद पवारांनी केंद्रात आणि राज्यात मोदींना साथ द्यावी, यासाठी लालबागच्या राजाला साकडे घातल्याचंही राणा यांनी सांगितल. राजकारणात काहीही शक्य नाही आणि अशक्यही नाही, तसंच अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतात, असंही रवी राणा म्हणाले.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, नंतर उपमुख्यमंत्री झाले. एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री होते, ते मुख्यमंत्री झाले. विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार थेट उपमुख्यमंत्री झाले, त्यामुळे राजकारणात काहीही होऊ शकतं, असं सूचक विधान रवी राणा यांनी केलं आहे. याआधी एप्रिल महिन्यात रवी राणा यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये भूकंप होईल, असं भाकित वर्तवलं होतं. यानंतर 2 जुलै रोजी अजित पवार सत्तेमध्ये सहभागी झाले होते. तसंच राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच रवी राणा शिवसेनेमध्ये भूकंप होईल, असा दावा करत होते.

Iraq Wedding Fire : लग्नसोहळ्यात अग्नी तांडव! वधू-वरासह वऱ्हाडी होरपळले, १०० जणांचा दुर्दैवी मृत्यू

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

रवी राणांच्या या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी त्यांच्यावर पलटवार केला. रवी राणा यांनी असे वक्तव्य करण्यापूर्वी, त्यावर शिक्कामोर्तब करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांची परवानगी घेतली होती का? तसं असेल तर रवी राणांच्या भाकिताने एक गोष्ट स्पष्ट झाली की, भाजपने फोडाफोडीचं राजकारण हे सत्ताकारणासाठी केले होते, अशी टीका सचिन अहिर यांनी केली.

एकलहरे-बेलापूर रस्त्यावर दरोडा; तरुणाची निर्घृणपणे हत्या, पत्नीला जबर मारहाण

- Advertisment -

ताज्या बातम्या