Thursday, September 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजशरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा; ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा; ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

प्रकृती अस्वास्थ्यामुळे येथील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना गुरुवारी सकाळी घरी सोडण्यात आले. पवार यांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथे त्यांच्यावर विविध चाचण्या करण्यात आल्या. त्यानंतर दोन दिवस रुग्णालयात ठेवल्यानंतर त्यांना आज डॉक्टरांच्या सल्ल्याने घरी सोडण्यात आले.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज एक्स या माध्यमातून शरद पवारांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याची तसेच ते मुंबईतील घरी विश्रांती घेत असल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान, रुग्णालयात दाखल झाल्याने पवारांना बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मतदान करता आले नाही. १९६७ नंतर पहिल्यांदा आपल्याला बारामतीतील निवडणुकीत मतदान करता येणार नसल्याची भावनिक पोस्टही त्यांनी समाज माध्यमात केली होती. डॉक्टरांनी पवारांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : केंद्रप्रमुख, अंगणवाडी पर्यवेक्षिकांकडे आता गावचा कारभार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अंगणवाडी पर्यवेक्षिका, केंद्रप्रमुख, कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी अशा जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांकडे आता गावचा कारभार आला आहे. याबाबतचे आदेश बुधवार (दि.9) रोजी जिल्हा...