Monday, October 19, 2026
Homeब्रेकिंग न्यूजशारदीय नवरात्रोत्सव : सप्तशृंगी गडावर भाविकांची गर्दी

शारदीय नवरात्रोत्सव : सप्तशृंगी गडावर भाविकांची गर्दी

सप्तशृंगीगड । वार्ताहर Saptshrungi Gad

- Advertisement -

शनिवार, रविवार सलग दोन दिवस सुती व सप्तमी आल्यामुळे सप्तशृंगगडावर देवीच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविकांची प्रचंड गर्दी उसळली होती. ‘जय देवीच्या जयघोषाने संपूर्ण गड परिसर दुमदुमून गेला होता. शनिवारपासूनच गडावर भाविकांची मोठी रिघ लागली होती. दिवसभर दर्शनबारी गजबजलेली होती. रविवारीदेखील हाच उत्साह कायम राहत भाविकांची अभूतपूर्व मांदियाळी पाहायला मिळाली. भाविकांच्या शिस्तीत आणि श्रद्धेत गडावरील मंदिरापासून ते थेट पहिल्या पायरीपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रविवारी सुमारे ६० -७० हजार भाविकांनी देवीचे दर्शन घेतले.

भाविकांच्या वाढत्या ओघामुळे फ्युनिक्यूलर रोपवे परिसरातही अलोट गर्दी पाहायला मिळाली. अल्पावधीत दर्शन घेण्यासाठी रोपवेचा पर्याय निवडणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्याने, रोपवेच्या तिकीट घराबाहेर आणि प्रतीक्षा कक्षात नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वयोवृद्ध, महिला आणि लहान मुलांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी विश्वस्त संस्था आणि प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

रविवारी देवीची पंचामृत महापूजा कळवणच्या उपविभागीय अधिकारी काश्मिरा संखे यांच्या हस्ते अत्यंत भक्तिभावाने संपन्न झाली. देवीच्या या सोहळ्यात विश्वस्त संस्थेच्या वतीने सामाजिक उपक्रमांतर्गत उल्हासनगर येथील भाविक सागर ठाकरे यांना पंचामृत महापूजेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. या धार्मिक सोहळ्यादरम्यान माजी खासदार राजन विचारे यांनी देवीची संकल्प आरती करून देश व राज्याच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली. तसेच, नाशिकचे माजी जिल्हाधिकारी डॉ. राधाकृष्णन बी. यांनी देखील गडाला भेट देऊन देवीचे दर्शन घेतले व आशीर्वाद घेतले.

यावेळी विश्वस्त तथा तहसीलदार रोहिदास वारुळे, ट्रस्टचे व्यवस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, मंदिर विभाग प्रमुख विश्वनाथ बर्डे, पर्यवेक्षक सुनील कासार आदींसह भाविक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Rahata : राहाता बाजार समितीत डाळिंबाची आवक; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata सोमवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) डाळिंबाला 225 रुपयांपर्यंत प्रतिकिलोला भाव मिळाला. सोमवारी डाळिंबाच्या (Pomegranate) 2328 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब...