Friday, November 22, 2024
Homeक्राईमशेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणारा जेरबंद

शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणारा जेरबंद

तीन कोटी 15 लाख रुपयांचे फसवणूक प्रकरण

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

शेअर मार्केटच्या नावाखाली तीन कोटी 15 लाख रूपयांची फसवणूक व 12 लाख रुपयांची चारचाकी वाहन पळवून घेऊन जाणार्‍या संशयित आरोपीला शेवगाव पोलीस व दरोडा वाहन पथक पुणे यांनी संयुक्त कारवाई करून जेरबंद केले. शंकर रावसाहेब शिंदे (रा. रावतळे करूडगाव, ता. शेवगाव) असे त्याचे नाव आहे.

- Advertisement -

कैलास सुभाष राऊत यांनी (रा. रावतळे कुरूडगाव) त्यांच्या मालकीची कार (एमएच 16 डीजी 9518) ही शंकर शिंदे याने चोरून नेल्याची फिर्याद शेवगाव पोलीस ठाण्यात दिली होती. यावरून 10 जुलै रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच सोपान माधव काळे (रा. कुरूडगाव) यांच्या फिर्यादीवरून शंकर शिंदे याच्याविरूध्द एसआर इनव्हेस्टमेंट शेअर मार्केट ट्रेडींग कंपनीच्या नावाने 3 कोटी 15 लाख रुपयांची फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करून फसवणूक केल्याचा गुन्हा 25 जुलै रोजी दाखल केला होता. या दोन्ही गुन्ह्यातील संशयित आरोपी शंकर शिंदे यास शेवगाव पोलीस व दरोडा वाहन पथक पुणे यांनी संयुक्त कारवाई करून सापळा लावून जेरबंद केले.

ही कारवाई पुणे येथील दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक संदीपान पवार, शेवगावचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, उपनिरीक्षक भास्कर गावंडे, अंमलदार बप्पासाहेब धाकतोडे, परशुराम नाकाडे, निलेश म्हस्के, नितीन भताने, शाम गुंजाळ, संतोष वाघ, राहुल खेडकर, सुरज भावले, समीर फकीर तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे अंमलदार राहुल गुंड्डू यांनी केली पुढील तपास सहायक निरीक्षक सुंदरडे करत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या