Wednesday, May 20, 2026
Homeक्राईमCrime News : शेअर मार्केटच्या नावाखाली 91 लाखांना गंडा

Crime News : शेअर मार्केटच्या नावाखाली 91 लाखांना गंडा

पाथर्डी तालुक्यातील घटना || सरपंचासह 9 जणांची फसवणूक, एकाला अटक

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाने जास्त व्याज आणि सहा महिन्यांत पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून एका सरपंचासह नऊ जणांची लाखोंची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी पाथर्डी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, इतर दोन फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. एकूण 91 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

घटनेची माहिती अशी की, तोंडोळी गावचे सरपंच नंदकिशोर शिवाजी वारंगुळे (वय 27) यांना त्यांचे ओळखीचे अनिल आबासाहेब बंड यांनी कोरडगाव येथे बोलावून त्यांचा भाचा श्रेयस जयराम गरड आणि पुतण्या रोहीत दादासाहेब बंड यांची ओळख करून दिली. हे तिघे शेअर मार्केट ट्रेडिंग करत असल्याचे सांगून, त्यांनी बोधेगाव येथे शौर्य ट्रेडर्स आणि कोरडगाव येथे शिवराज ट्रेडर्स नावाचे ऑफिस सुरू केले असल्याचे सांगितले. गुंतवणूकदारांना 17 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त व्याज आणि सहा महिन्यांत पैसे दुप्पट करण्याचे आश्वासन देऊन त्यांनी सरपंच वारंगुळे यांना विश्वासात घेतले.

दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी सरपंच वारंगुळे यांनी शौर्य ट्रेडर्समध्ये 24 लाख 50 हजार रुपये गुंतवले. काही दिवसांनंतर पैशाची गरज पडल्याने त्यांनी पैसे मागितले असता, आरोपींनी फक्त 5 लाख रुपये परत केले. उर्वरित 19 लाख 50 हजार रुपये देण्यास टाळाटाळ केली आणि आर्थिक अडचणींचे कारण सांगून भुलथापा दिला. अखेर आरोपी गाव सोडून पळून गेले आणि सरपंचांना फसवणुकीची जाणीव झाली.

सरपंच वारंगुळे यांनी पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी अनिल आबासाहेब बंड (कोरडगाव) याला अटक केली. रोहीत दादासाहेब बंड (कोरडगाव) आणि श्रेयस जयराम गरड (बालमटाकळी) हे दोघे फरार असून, त्यांचा शोध घेण्यात येत आहे.पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप ढाकणे हे प्रकरणाचा तपास करीत आहेत.

पीडित आणि फसवणुकीची रक्कम
नंदकिशोर शिवाजी वारंगुळे (तोंडोळी) : 24.5 लाख, बद्रीनारायण आबासाहेब मुखेकर (कोरडगाव) : 26 लाख, शिवाजी भानुदास पोपळे (मुंगी) : 5 लाख, पोपट भाउसाहेब जाधव (हातगाव) 2 लाख, योगेश चितळे (चितळवाडी) 1 लाख 50 हजार रुपये, सोमनाथ कारभारी घनवट (नजिक बाभुळगाव) : 5 लाख, योगेश गहिणीनाथ घनवट (नजिक बाभुळगाव) : 2 लाख, भिमराज भाउसाहेब पवार (हातगाव) 2 लाख, विजय बाळासाहेब मुखेकर (कोरडगाव) 28 लाख.

ताज्या बातम्या

default-featured-image

Nashik APMC News : नाशिक बाजार समिती उपसभापतीपदी प्रल्हाद काकड

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Nashik APMC News) उपसभापतीपदी प्रल्हाद काकड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. माजी उपसभापती जगन्नाथ...