Tuesday, March 25, 2025
Homeनगरशेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक करणारे दोघे अटकेत

शेअर मार्केट गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक करणारे दोघे अटकेत

13 लाखाची रोकड हस्तगत || सायबर पोलिसांची कामगिरी

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणार्‍या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करणार्‍या सायबर पोलिसांनी याच टोळीतील आणखी दोघांना अटक केली आहे. यापूर्वी चौघांना अटक केली होती. दरम्यान, संशयित आरोपी हे परदेशी गुन्हेगारांच्या मदतीने नागरिकांची आर्थिक फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. राजेश राठोड ऊर्फ राजेंद्र भगीरथ सिंग (रा. बिंजारी राणीगाव, जि. नागौर, राज्यस्थान) व दीपककुमार घनशामभाई जोशी (रा. वसंत विहार, सोलापूर, मुळ रा. चाणस्मा, जि. पाटणा, राज्य गुजरात) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून 12 लाख 92 हजाराची रोकड, एक कार, तीन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.

- Advertisement -

27 जानेवारी 2025 रोजी शेंडी (ता. नगर) येथील रहिवाशी आयटी इंजिनिअरने सायबर पोलीस ठाण्यात शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचे आमिषाने 1 कोटी 10 लाख 80 हजार रूपयांची फसवणूक झाली असल्याची फिर्याद दिली होती. फिर्यादीनंतर सायबर पोलिसांनी आर्थिक व्यवहारांचे तांत्रिक विश्लेषण केले. यातून मिळालेल्या बँक खात्यांच्या तपासणीअंती चौघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीतून राजेश राठोड उर्फ राजेंद्र भगीरथ सिंग याचा या फसवणुकीत महत्त्वाचा सहभाग असल्याचे समोर आले. तो कंबोडियातील कंपन्यांशी संपर्क साधून पैसे परदेशात पाठवण्याचे काम करत होता. पोलिसांनी त्याला अटक केली.

दरम्यान, राजेंद्रच्या चौकशीतून या आर्थिक फसवणुकीत चीनमधील नागरिकांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. या टोळीने भारतीय चलन परदेशी डिजिटल चलनामध्ये रूपांतरित करून ते कंबोडियामध्ये पाठवले होते. राजेंद्रच्या माहितीच्या आधारे हवाला नेटवर्कव्दारे पैसे हस्तांतरित करणार्‍या दीपककुमार जोशी यालाही अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम, पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, पोलीस अंमलदार योगेश गोसावी, अभिजीत अरकल, राहुल हुसळे, अरूण सांगळे, मोहम्मंद शेख, नीलकंठ कारखेल, दिगंबर कारखेल, मल्लिकाअर्जुन बनकर, दिपाली घोडके, सविता खताळ, प्रितम गायकवाड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...