Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजShare Market : इराण-इस्राईल युध्दाचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम; सेंसेक्स, निफ्टीमध्ये मोठी...

Share Market : इराण-इस्राईल युध्दाचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम; सेंसेक्स, निफ्टीमध्ये मोठी घसरण

मुंबई | Mumbai
पश्चिम आशियातील भूराजकीय तणावाचा भारतीय भांडवली बाजारावर परिणाम होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आज सेन्सेक्स १ हजार २६४ अंकांनी कोसळला तर निफ्टीत ३४४ अंकांची घसरण झाली आहे. शेअर बाजारात घसरण येण्याचा गुंतवणूकदारांना अंदाज होताच. पण ऐन सणासुदीत सेन्सेक्सची वाताहत अनेकांना नाराज करणारी ठरली. युद्धाचे ढग जितके गडद होतील, तितका शेअर बाजार गुंतवणूकदारांचे तोंडचे पाणी पळवणार आहे.

नवरात्राच्या पहिल्या दिवशी शेअर मार्केट प्री ओपनमध्ये लाल रंगात सुरवात झाली. रुपया १० रुपयांनी कमजोर सुरवात झाली. सेन्सेक्स ८३, ३५० अंकांवर आहे. तर निफ्टी २५,५१६ अंकांवर आहे. सेन्सेक्स १००० अंकांनी कोसळला आहे. तर निफ्टी प्री ओपनिंगदरम्यान ४०८ अंकांनी कोसळले आहे. जपानच्या मार्केटमध्ये पुलबॅक होत असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किंमती वाढत आहे.

- Advertisement -

मंगळवारी इराणने इस्त्रायलवर हल्ला केला. त्यामुळे आता दोन्ही देशांमध्ये युध्द भडकण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम कच्चा तेलाच्या किंमतींवर दिसून आला आहे. क्रूड ऑईल महागले आहे. बुधवारी गांधी जंयतीची सुट्टी असल्याने शेअर बाजाराला सुट्टी होती. आज भारतीय शेअर बाजार उघडताच इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला. BSE Sensex सोमवारी ८४,२६६ अंकांवर बंद झाला होता. त्यानंतर तो ८५० ते ९९५.९२ अंकांपर्यंत गडगडला.

युद्धाच्या धुमश्चक्रीत शेअर बाजारात मोठी उलथापालथ होईल, याचे संकेत अगोदरच मिळाले होते. अमेरिकन बाजाराने कालच घसरण नोंदवली होती. त्यामुळे आज बाजार उघडताच गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली. आज प्री-ओपन मार्केटमध्येच बाजाराने लाल रंगात सुरवात केली. त्यामुळे बाजारात मोठी घसरण आली.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या