Tuesday, March 25, 2025
Homeनगरशेअर मार्केटमध्ये युवकाची चार लाखाची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये युवकाची चार लाखाची फसवणूक

10 टक्के परतावा देण्याचे आमिष || न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास 10 टक्के परतावा देण्याच्या आमिषाने एका युवकाची चार लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रेमराज धोंडीभाऊ कुनगर (वय 22 रा. टाकळी लोणार, ता. श्रीगोंदा, हल्ली रा. यशवंत कॉलनी, नगर- सोलापूर रस्ता, अहिल्यानगर) असे फसवणूक झालेल्या युवकाचे नाव आहे. दरम्यान, कुनगर यांनी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात तक्रार दखल केली होती. त्या तक्रारीवरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एस. लोणे यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर कुनगर यांच्या फिर्यादीवरून सोमवारी (18 नोव्हेंबर) नगर तालुका पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

भूषण दिपेश देशमुख (रा. लक्ष्मी संकुल, भुषण कॉलनी, एमजी कॉलेजच्या पाठीमागे, ता. जि. जळगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सदरची घटना 11 सप्टेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 दरम्यान घडली आहे. फिर्यादी हे शिक्षण घेतात. ते सप्टेंबर 2022 ते डिसेंबर 2022 दरम्यान नगर तालुक्यातील साकत खुर्द व अहिल्यानगर शहरातील अहमदनगर कॉलेजमध्ये असताना त्यांनी संशयित आरोपीकडे शेअर मार्केटसाठी गुंतवणूक केली होती.

त्याने गुंतवणूकीवर 10 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. फिर्यादी यांनी संशयित आरोपीला युपीआय मार्फत चार लाख रूपये पाठविले होते. दरम्यान, संशयित आरोपीने फिर्यादीला मोबदला न देता त्यांची फसवणूक केली. याविरूध्द फिर्यादीने न्यायालयात तक्रार दाखल केली. तेथे त्यावर सुनावणी होऊन न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार लबडे करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

default-featured-image

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी तेलंगणा येथून...