Saturday, July 27, 2024
Homeनगरगुंतवणूकदारांची रक्कम पत्नी, मुलाच्या खात्यावर केली वर्ग

गुंतवणूकदारांची रक्कम पत्नी, मुलाच्या खात्यावर केली वर्ग

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शेअर मार्केट ट्रेंडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची फसवणूक करणार्‍या बाळासाहेब निवृत्ती काळे (रा. रूपमातानगर, सावेडी) याने फसवणुकीची रक्कम पत्नी, मुलाच्या नावे असलेल्या बँक खात्यावर वर्ग केल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. दरम्यान, गुंतवणूकदारांनी काळे याच्याकडे गुंतवणूक करताना रोख स्वरूपात केल्याने अनेक गुंतवणूकदार पोलिसांसमोर येण्यास टाळाटाळ करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

शेअर मार्केट ट्रेंडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची तब्बल साडेतेरा कोटींची फसवणूक करून बँकॉक येथे गेलेल्या काळे याला भारतात येताच आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. त्याला न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी दिल्यानंतर त्याने शेअर मार्केट ट्रेडिंगमधील गुंतवणुकीबाबत माहिती पोलिसांना दिली आहे. हा फसवणुकीचा प्रकार ऑगस्ट 2023 मध्ये उघडकीस आल्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.

काळे याच्याकडे एका शेअर ट्रेडिंग कंपनीची एजन्सी होती. त्याव्दारे त्याने कंपनीतील गुंतवणुकीतून दर महिन्याला पाच टक्के परतावा, दामदुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखविले. नगर मधील कमी गुंतवणूकदारांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे त्यांनी एक कोटी पेक्षाही कमी गुंतवणूक केली. मात्र सातारा, पुणे, मुंबई या ठिकाणच्या गुंतवणूकदारांनी काळे याच्याकडे 10 ते 12 कोटींची गुंतवणूक केली. गुंतवणूक करताना त्याला चेक किंवा बँक खात्यावर पैसे न देता रोख स्वरूपात दिले. सुरूवातीला काळे याने गुंतवणूकदारांना योग्य परतावा देखील दिला. नंतर त्याने गुंतवणूकदरांना थापा मारून परदेशात पळ काढला.

दरम्यान, काळे पोलिसांच्या तावडीतून बाहेर आल्यानंतर आपले पैसे देईल, अशीही काही गुंतवणूकदारांची भावना असल्याचे पोलिसांनी सांगितले. सरकारचा कर वाचविण्यासाठी काळे याला काही गुंतवणूकदारांनी रोख स्वरूपात पैस दिले असल्याने पोलिसांनी त्या गुंतवणूकदारांना संपर्क करून देखील ते जबाबासाठी येण्यास तयार होत नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या