Monday, March 31, 2025
Homeमनोरंजन“मी पूर्ण कपड्यांत फिरते, बाकीच्यांचे…”; उर्फी जावेद प्रकरणी शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत

“मी पूर्ण कपड्यांत फिरते, बाकीच्यांचे…”; उर्फी जावेद प्रकरणी शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया चर्चेत

मुंबई | Mumbai

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यात कपड्यावरुन वाद सुरू आहे. अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, मनसे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. सध्या त्यांनी मांडलेलं मत चर्चेत आहे.

- Advertisement -

नवी मुंबईतील एका कार्यक्रमात शर्मिला ठाकरे उपस्थित होत्या. कार्यक्रम संपल्यानंतर माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारले. उर्फीच्या कपडे घालण्याच्या स्टाईलवर तुमची प्रतिक्रिया काय असे पत्रकारांनी विचारले असता राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी दोन वाक्यात अगदी मिश्कील पण जबरदस्त प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, ‘मी पूर्ण कपड्यात फिरते. बाकीच्यांचे मला माहित नाही.’ असं उत्तर देऊन त्या लगेच निघून गेल्या.

दरम्यान सार्वजनिक ठिकाणी उर्फी जावेद (Urfi Javed) घालून फिरत असलेल्या कपड्यांवरुन चित्रा वाघ चांगल्याच संतापल्या आहेत. चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद विरोधात थेट पोलिसांत तक्रार दाखल करत राज्य महिला आयोगाने कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर चित्रा वाघ यांच्याविरोधात उर्फी जावेदने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती.

सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन केल्याप्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर मुंबई पोलीस आयुक्तांनी (Mumbai Police) उर्फी जावेदच्या चौकशीचे आदेश दिले होते. यानंतर अंधेरीच्या अंबोली पोलिसांनी उर्फीची चौकशी केली. याआधी चित्रा वाघ त्यांच्या कार्यकर्त्यांसह आपल्यावर हल्ला करु शकतात, त्यामुळे त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मागणी उर्फी जावेदने राज्य महिला आयोगाकडे केली होती. यानंतर महिला आयोगाने पुढील कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता याप्रकरणात चित्रा वाघ यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, पोलीस चौकशीनंतर उर्फी किमान काही दिवस बोल्ड फोटोशूट करणार नाही असं अनेकांना वाटलं होतं. परंतु राजकीय दबावाला घाबरेल ती उर्फी कसली. अभिनेत्रीने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला असून या त उर्फीचा सर्वात बोल्ड लूक पाहायला मिळत आहे. सेमी न्यूड लूकवर नेटकऱ्यांनी जबरदस्त टीका केली आहे. असं असलं तरी तिच्या कट्टर चाहत्यांनी मात्र लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

उर्फी जावेद मुस्लीम असल्याने भाजपच्या टार्गेटवर

उर्फी जावेदलाच भाजपा का टार्गेट करत आहे? उर्फी जावेद मुस्लीम आहे म्हणून तिला टार्गेट केले जात आहे का? असे सवाल भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी उपस्थित केले आहेत. तसेच फक्त उर्फीच कशाला कंगणा रनौत, दीपीका पादुकोन, कतरिना कैफ या अभिनेत्री देखील बोल्ड कपडे घालतात, त्यांच्यावरही टीका करा. असेही तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे.

तृप्ती देसाई म्हणाल्या, आपला देश संविधानानुसार चालतो. उर्फीने काय कपडे घालावे आणि काय घालू नये हा तिचा प्रश्न आहे. या आधी अनेक अभिनेत्रींनी बोल्ड कपडे घातले आहेत. मविआच्या काळात केतकी चितळेला त्रास दिला. तसे उर्फी जावेदला वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये फिरवले जाईल. सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे.

संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. पोलिसांना विनंती आहे की, संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्यचा अधिकार दिला आहे तर योग्य तो न्याय मिळालाच पाहिजे. विनाकारण उर्फी जावेदला कुणी टार्गेट करत असेल तर आम्ही तिच्यासोबत आहोत. असेही तृप्ती देसाई यांनी स्पष्ट केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shirdi News : शिर्डी विमानतळावरून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाईट लँडीगची गुढी

0
रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे असलेल्या शिर्डी विमानतळावरुन रविवारी 30 मार्चपासून नाईट लँडीग सुरू झाली असून हैदराबादवरुन इंडीगो एअरलाईनचे विमान 56...