Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्या8 जुलैला नाशकात ‘शासन आपल्या दारी’

8 जुलैला नाशकात ‘शासन आपल्या दारी’

नाशिक । प्रतिनिधी Nashik

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ वितरित करण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 8 जुलैला नाशिकमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.

- Advertisement -

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमात जनतेला स्थानिक स्तरावरच एकाच छताखाली विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येत आहे. शासन मार्गदर्शनानुसार राज्यभरात एकाचवेळी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत नाशिकमध्ये येत्या 8 जुलैस होणार्‍या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

तपोवनातील मोदी मैदानावर कार्यक्रम आयोजनाची प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. या कार्यक्रमात लाभार्थीना योजनांचे प्रमाणपत्र वितरणासह तेथे शासकीय विभागांचे माहितीपर विविध 25 स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत.

यावेळी रोजगार मेळावाही घेण्यात येणार आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने गैरसोय टाळण्यासाठी वॉटरप्रूफ मंडप उभारणे, आसनव्यवस्था, वाहनतळ, आरोग्य सुविधा आदी आघाड्यांवर प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. दरम्यान, ‘शासन आपल्या दारी’ द्वारे उपक्रमासाठी जिल्हाभरातून किमान 50 हजार नागरिक जिल्ह्यात आजपर्यंत 70 शिबिरांमधून दोन लाख 44 हजार 43 हजेरी लावण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या