Monday, November 25, 2024
Homeमनोरंजन“तुनिषाला हिजाब घालण्यासाठी...”; आईचे शीझान आणि कुटुंबियांवर गंभीर आरोप

“तुनिषाला हिजाब घालण्यासाठी…”; आईचे शीझान आणि कुटुंबियांवर गंभीर आरोप

दिल्ली | Delhi

तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. दिवंगत अभिनेत्रीची आई वनिता शर्मा (Vanita Sharma) यांनी यापूर्वीच आपल्या मुलीचा सहकलाकार शीझान खानवर आपल्या मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे. शीजान खान पोलीस कोठडीत असून पोलीस या प्रकरणाच्या तपासात सातत्याने सक्रिय आहेत. दरम्यान, तुनिषा शर्माच्या आईने शीझान खान व कुटुंबियांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

- Advertisement -

वनिता शर्मा म्हणाल्या की, तुनिषाला हिजाब घालण्यासाठी शिजान खानकडून प्रवृत्त केले जात होते. तुनिषाच्या आत्महत्येच्या १५ मिनिटानंतर अँबुलन्स आली. शिजान खानने स्वतः तुनिषाला आत्महत्या केल्यानंतर खाली उतरवल होतं. तुनिषा माझावर कधीच नाराज नव्हती. शिजानची बहीण फलक नाज तुनिषाला नेहमी शिजान खानच्या घरी घेऊन जात होती.

विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा! १०वी – १२वीच्या परीक्षेची तारीख जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

तुनिषाने स्वतःचा शरीरावर love of everything चा टॅटु सुद्धा बनवला होता. तुनिषा ही कधीच डिप्रेशनमध्ये नव्हती. तुनिषा आत्महत्या करणारी मुलगी नाही. शिजान खानने तुनिषाला त्यांच्या ब्रेकअपचा दिवशी कानाखाली मारली होती, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच, शिजान खानला जास्तीत जास्त कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी वनिता शर्मांनी केली आहे.

तुनिषा शर्मा आणि शीजान खान यांची मैत्री होती. अनेकदा वेगवेगळ्या निमित्ताने तुनिषा शीजानला महागड्या भेटवस्तू देत होती. सुरुवातीला सर्व व्यवस्थित होते. पण मागील काही काळापासून तुनिषावर मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकला जात होता. धर्मांतराबाबतचा निर्णय घेत नाही म्हणून शीजानने तुनिषासोबत आधीच्या तुलनेत संवाद साधणे कमी केले होते. यामुळेच तुनिषा दबावात होती.

ऋषभ पंतचा अपघात नेमका कसा झाला? समोर आली मोठी माहिती

तिने एकदा शीजानशी बोल असेही आईला सांगितले होते. पण तुनिषा प्रचंड मानसिक दबावाखाली आहे आणि आत्महत्येसारखे पाऊल उचलेल याची जाणीव आईला नव्हती. ती शीजानशी बोलून परिस्थिती निवळावी यासाठी प्रयत्न करत होती. पण शीजानकडून असलेला दबाव असह्य झाला आणि तुनिषाने टोकाचे पाऊल उचलले, असे वनिता शर्मा यांनी सांगितले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या