Thursday, October 1, 2026
Homeदेश विदेशशहबाज शरीफ यांच्या एका घोडचुकीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठं हसू; एका ट्विटमुळे जगभरात...

शहबाज शरीफ यांच्या एका घोडचुकीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठं हसू; एका ट्विटमुळे जगभरात बनले थट्टेचा विषय

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ले थांबवण्याची आणि दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे कौतुक करत मध्यस्थी केल्याचे जाहीर केले. पण, यादरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ हे एका नवीन वादात सापडले आहेत. सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म एक्सवरील त्यांची एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यामुळे अमेरिका-इराण संघर्षामध्ये पाकिस्तानच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

अमेरिका-इराण यांच्यात युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर पाकिस्तानने मध्यस्थी केल्याचे सांगण्यात येत आहे. युद्धविरामाच्या या ऐतिहासिक घटनेच्या आनंदात सहभागी होण्याच्या नादात पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे हसू झाले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर शहबाज शरीफ यांनी केलेले एक ट्विट सध्या जगभरात चर्चेचा आणि थट्टेचा विषय बनले आहेत. पाकिस्तानचे धोरणात्मक निर्णय बाहेरील शक्तींकडून (विशेषतः अमेरिका) घेतले जातात का? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

- Advertisement -

शहबाज शरीफ यांनी लिहिले होते की, “मुत्सद्देगिरीला वाव देण्यासाठी मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना अत्यंत कळकळीची विनंती करतो की त्यांनी ही मुदत दोन आठवड्यांसाठी वाढवावी.” त्याचबरोबर शरीफ यांनी इराणलाही सद्भावनेपोटी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याचे आवाहन केले होते. पाकिस्तानचे मध्यस्थीचे प्रयत्न स्थिर, भक्कम आणि प्रभावीपणे पुढे सरकत आहेत, यावर त्यांनी जोर दिला होता.

RBI Repo Rate: रिझर्व बँकेचे पतधोरण जाहीर; गृह कर्जच्या हफ्त्यात बदल होणार? आरबीआय गर्व्हर्नर काय म्हणाले?

दरम्यान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री, सय्यद अब्बास अराघची, यांनी देखील एक्सवर पोस्ट करुन वृत्ताला दुजोरा दिला होता. यावेळी अराघची यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी युद्धविरामासाठी केलेल्या विनंतीचा उल्लेख केला आहे.

नेमकं ट्विट काय होतं?
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणला दिलेली डेडलाईन वाढवण्याचे आणि मुत्सद्देगिरीसाठी वेळ देण्याचे आवाहन करणारे एक ट्विट केले होते. मात्र, युझर्सनी या ट्विटची ‘एडिट हिस्ट्री’ तपासली असता एक धक्कादायक बाब समोर आली. शहबाज शरीफ यांनी जे मजकूर पोस्ट केला होता, त्याच्या अगदी वर “Draft – Pakistan’s PM Message on X” (ड्राफ्ट – X वर पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा संदेश) असे लिहिले होते.

या एका ओळीमुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी शहबाज शरीफ यांना चांगलेच धारेवर धरले आहे. सामान्यतः कोणत्याही देशाच्या पंतप्रधानांची टीम स्वतःसाठी मजकूर तयार करताना “पाकिस्तानचे पंतप्रधान” असा उल्लेख ड्राफ्टमध्ये करत नाही. त्यामुळे हा संदेश डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीमकडून आला होता आणि शहबाज शरीफ यांनी तो न वाचता, ‘ड्राफ्ट’च्या ओळीसह जसाच्या तसा कॉपी-पेस्ट केला, असा दावा केला जात आहे. 12.47 वाजता मेसेज एडिट करुन थेट पोस्ट केला. एका मिनिटाच्या आत Draft मेसेज हटवून थेट पोस्ट केल्याने सोशल मीडियावर अनेक प्रश्न विचारले जाऊ लागले. हा मेसेज ट्रम्प यांच्या टीमकडून पाठवला होता का? असा प्रश्न विचारला जात आहे.

ताज्या बातम्या

रायगडच्या दिवेआगर समुद्रात आळंदी येथील ८ विद्यार्थ्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू

0
पुणे |प्रतिनिधी| Pune रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर पोहण्यासाठी उतरलेल्या पुण्याच्या आळंदी येथील खाजगी क्लासच्या आठ विद्यार्थ्यांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी...