Tuesday, March 25, 2025
Homeदेश विदेशSheikh Hasina: शेख हसीना पलायनानंतर पहिल्यांदाच बोलल्या; "माझ्या हत्येचे षडयंत्र रचण्यात आले…"

Sheikh Hasina: शेख हसीना पलायनानंतर पहिल्यांदाच बोलल्या; “माझ्या हत्येचे षडयंत्र रचण्यात आले…”

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी सत्तेवरून पायउतार होत आपल्या देशातून पलायन करावे लागले होते. त्यांनी भारतात आश्रय घेतला असून सध्या भारतातील अज्ञात ठिकाणी वास्तव्यास आहेत. दरम्यान, शेख हसीना यांनी त्यांच्या देशातील सत्तांतरावर पहिल्यांदाच मोठे वक्तव्य केले आहे. बांगलादेश ५ ऑगस्टचा तो दिवस सहजपणे विसरू शकत नाही. सत्तेतून बाहेर पडताच मी आणि माझी बहीण शेख रेहाना यांच्या हत्येचे षडयंत्र रचण्यात आले होते असा खुलासाही त्यांनी केलाय.

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत भारतात आश्रय घेतला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर बांगलादेशमध्ये राजकीय उलथापालथ झाली, देशभरात आंदोलन पेटले. हे आंदोलन इतके पेटले की देशातील विविध भागात दंगली उसळल्या. मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडला, या हिंसाचारात ६०० हून (सरकारने जाहीर केलेली आकडेवारी) अधिक लोकांचा बळी गेला आहे. हिंदूंची घरे, मंदिरे यांना टार्गेट करण्यात आले. शेख हसीना यांनी पलायन केल्यानंतर मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार गठित करण्यात आले आहे. युनूस हेच सध्या बांगलादेशचा कारभार हाकण्याचे काम करत आहेत.

- Advertisement -

शेख हसीना यांनी शुक्रवारी रात्री त्यांच्या बांगलादेश आवामी लीगच्या फेसबुकवर ऑडिओ संदेश पोस्ट केला आहे. त्यात त्या म्हणाल्या की, रेहाना आणि मी थोडक्यात वाचलो, मृत्यू आमच्या डोळ्यासमोर होता आणि आमच्याकडे फक्त २०-२४ मिनिटे बाकी शिल्लक होती. आमच्या हत्येचे षडयंत्र अनेकदा रचण्यात आले होते. २१ ऑगस्टला झालेल्या घटनेत वाचणे, कोटालीपारा इथे बॉम्ब स्फोटातून बचावणे आणि ५ ऑगस्टला जिवंत राहणे ही अल्लाहची इच्छा होती. जर अल्लाहची इच्छा नसती तर आतापर्यंत मी जिवंत राहिली नसती असे त्यांनी सांगितले.

“मला कशाप्रकारे मारण्याचा डाव रचला होता ते सगळ्यांनी पाहिले. अल्लाहच्या कृपेने मी वाचले. मी पीडित असून माझ्या देशाविना, घराविना राहत आहे. सर्व काही जाळून टाकले असेही शेख हसीना यांनी म्हटले. शेख हसीना यांची सुरक्षा व्यवस्था चोख असतानाही अनेकदा त्या हत्येच्या प्रयत्नातून वाचल्या. २००४ मध्ये ढाका ग्रेनेड हल्ला २१ ऑगस्ट २००४ रोजी पक्षाच्या दहशतवाद विरोधी रॅलीत झाला होता. त्यावेळी २४ लोक मारले गेले आणि ५०० हून अधिक जखमी होते. हा हल्ला संध्याकाळी ५ वाजून २२ मिनिटांनी झाला तेव्हा विपक्ष नेत्या शेख हसीना या २० हजारांच्या सभेला संबोधित करत होत्या. या हल्ल्यात हसीना या किरकोळ जखमी झाल्या.

कोटालीपारा इथं शेख हसीना यांना मारण्याचा आणखी एक प्रयत्न करण्यात आला ज्याचा उल्लेख त्यांनी ऑडिओ संदेशमध्ये केला. २१ जुलै २००० रोजी ७६ किलो आरडीएक्स बॉम्ब जप्त करण्यात आले होते आणि २ दिवसांनी कोटालीपूराच्या शेख लुत्फोर रहमान आयडिएल कॉलेजमधून ४० किलो आरएडीएक्स जप्त केले होते. ज्याठिकाणी आवामी लीगच्या अध्यक्षा आणि तत्कालीन विरोधी पक्षनेत्या शेख हसीना या २२ जुलैला रॅली करणार होत्या.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...