Saturday, July 27, 2024
Homeनगरशेरी चिखलठाण वनक्षेत्राला आग लावणारा गजाआड

शेरी चिखलठाण वनक्षेत्राला आग लावणारा गजाआड

उंबरे |वार्ताहार| Umbare

राहुरी (Rahuri) तालुक्यातील शेरी चिखलठाण (Sheri Chikhalthan) हद्दीतील राखीव वनक्षेत्रामध्ये आग (Forest Area Fire) लावत जंगलक्षेत्रातील रोपे, पालापाचोळा जाळणार्या इसमास पकडून गजाआड करण्यात आले. न्यायालयात आरोपीला (Accused) दोन दिवसाची पोलिस कोठडी (Police Cell) सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

पेट्रोल व डिझेल विक्री करून जमा झालेली रोकड कामगारानेच पळविली

म्हैसगाव वन विभागाअंतर्गत असणार्या चिखलठाण हद्दीमध्ये फॉरेस्ट गट क्र. 60 मध्ये आरोपी सजन हिरामन शेख रा. शिन्दोडी ता. संगमनेर यास पकडण्यात आले आहे. चिखलठाण वन क्षेत्राला आग लागल्याचे कळताच वनकर्मचार्‍यांनी धाव घेतली. आग (Fire) लागली असताना जंगल क्षेत्रामध्ये आरोपी शेख हा वन कर्मचार्‍यांना दिसला. त्याची झाडाझडती घेतली असता त्याकडे आगपेटी आढळली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वन कर्मचार्‍यांसह ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.

‘या’ तारखेला सुटणार कुकडीचे उन्हाळी आवर्तन

आगीमुळे वन विभागाने (Forest Department) पाच हेक्टर क्षेत्रावर लावलेल्या रोपांसह झाडांचे मोठे नुकसान (Loss) झाले. वनक्षेत्रपाल वाय.जे. पाचारणे यांच्या मार्गदर्शनात वनपाल रोकडे. शेंडगे, रायकर, वनरक्षक कोळी, गाडेकर, घोडसरे, चव्हाण, खेमनर, जाधव, वनकर्मचारी वायाळ, चालक ताराचंद गायकवाड यांनी आरोपीला पकडून वनविभागाच्या राहुरीच्या कार्यालयात आणले. गुन्हा दाखल (Filed a Case) झाल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता शासकीय वकील म्हणून अ‍ॅड. वाघ यांनी काम पाहिले. आरोपीला दोन दिवस पोलिस कोठडी (Police Cell) सुनावल्यानंतर त्याची राहुरी पोलिस (Rahuri Police) कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली आहे.

दोन शिक्षकांवर निलंबनाचा प्रस्ताव

सध्या उन्हाळ्याचे दिवस असून आपल्या तालुक्यामध्ये वनक्षेत्र हे मोठ्या प्रमाणात आहे. प्रत्येकाने झाडे लावा, झाडे जगवा, या महत्वकांक्षी हेतूने आपण झाडे लावत असतो, झाडे जगवत असतो. वनक्षेत्रामध्येही मोठ्या प्रमाणात झाडी असून सध्या उन्हाच्या दिवसांमध्ये गवत वाढलेले आहे.तरी कोणीही असे अघोरी प्रयोग करून आग लावण्याचे काम करू नये. या आगीमुळे निसर्ग संपत्तीची हानी होत आहे. प्रत्येकाने काळजी घेऊन सहकार्य करण्याची भूमिका बाळगणे गरजेचे असल्याचे मत राहुरीचे वनक्षेत्रपाल वाय जे पाचरणे यांनी केले आहे

महिलेला भररस्त्यात मारहाण पीआय गोकावे निलंबीत

- Advertisment -

ताज्या बातम्या