Sunday, September 15, 2024
Homeमुख्य बातम्याकळवण कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व

कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेतकरी विकास पॅनलचे वर्चस्व

कळवण । प्रतिनिधी Kalwan

- Advertisement -

लोकनेते स्व. ए टी पवार कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार नितीन पवार व धनंजय पवार यांच्या शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १५ जागांवर दणदणीत विजय मिळवत माजी आमदार जे पी गावित व रविंद्र देवरे यांच्या परीवर्तन पॅनलचा पराभव झाला आहे.

कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सण २०२३ ते २०२८ या पंचवार्षिक निवडणुकीत १८ जागेंसाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत विद्यमान आमदार नितीन पवार, धनंजय पवार विरुद्ध माजी आमदार जे पी गावित रविंद्र देवरे असा सामना रंगला होता. यात शेतकरी विकास पॅनलने सोसायटी, व्यापारी, हमाल तोलारी गटातून सर्व व ग्रामपंचायत गटातुन एक जागेवर विजय मीळवीला तर रविंद्र देवरे यांचे परीवर्तन पॅनलच्या ग्रामपंचायत गटातुन तीन जागेंवर समाधान मानावे लागले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा..

विजयी झालेले उमेदवार

– शेतकरी विकास पॅनलचे सोसायटी सर्वसाधारण गटातुन सुधाकर खैरनार (३२७), दिलीप कुवर (२७७), बाळासाहेब गांगुर्डे (३०७), दत्तू गायकवाड (२४६), प्रविण देशमुख(२५८), पंढरीनाथ बागुल (२३४), सोमनाथ पवार (२८६), धनंजय पवार (२९५), यशवंत गवळी (४१५), सुनिता जाधव (३११), रेखा गायकवाड (२७४), बाळासाहेव वराडे (२९४), ज्ञानदेव पवार (३९०), भरत पाटील (३६२), शितलकुमार अहिरे (३७५), व्यापारी गट योगेश महाजन (२५३), योगेश शिंदे (२४३) हमाल तोलारी गटातुन शशिकांत पवार हे विजयी झाले आहेत.

मविप्र निवडणुकीतील पराभवाचा घेतला बदला

धनंजय पवार यांनी दोन पंचवार्षिक बाजार समितीचा केलेला विकास व प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन तसेच विद्यमान आमदार नितीन पवार, जिपच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार कळवणचे नगराध्यक्ष कौतिक पगार यांची खंबीर साथ याच्या जोरावर निवडणूक एकहाती जिंकत प्रतिस्पर्धी माजी आमदार जे पी गावित व रविंद्र देवरे या जोडगोळीला धक्का देत रविंद्र देवरे यांचा पराभव झाला आहे

तालुक्यातील शेतकरी केंद्रबिंदु मानुन कळवण बाजार समितीचा विकास केला आहे. आमदार नितीन पवार व जिपच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांच्या माध्यमातून उर्वरित कामे पुर्ण करु.

धनंजय पवार

- Advertisment -

ताज्या बातम्या