Tuesday, January 6, 2026
Homeनगरशेवगाव शहरात नगरपालिकेकडून पुन्हा अतिक्रमणावर हातोडा

शेवगाव शहरात नगरपालिकेकडून पुन्हा अतिक्रमणावर हातोडा

वाहतूक कोंडीने अनेक ठिकाणी कोंडला होता श्वास

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

बहुचर्चित शेवगाव शहरांमधील अतिक्रमणावर अखेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी हातोडा चालवला. स्वतः अतिक्रमण हटाव मोहिमेत पुढाकार घेऊन पथकाला सूचना देत शहरातील अतिक्रमणांवर अखेर जेसीबी चालवला. त्यांच्या या धाडसी कर्तव्याचे सर्वसामान्य जनतेमधून कौतुक होत आहे.

- Advertisement -

शहरातील वाढत्या-अतिक्रमणामुळे मुख्य रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर होता. नित्याच्या वाहतूक कोंडीने सर्वसामान्य जनता हतबल झाली होती. शहरातील प्रमुख रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात अडकल्याने पादचार्‍यांचा श्वासही गुदमरला होता. शेवगाव शहरातून जाणार्‍या गेवराई, नेवासा, पाथर्डी, अहिल्यानगर रस्त्यावरील अतिक्रमणे सार्वजनिक बांधकाम खात्याने फेब्रुवारीमध्ये हटवल्यानंतर नगरपरिषदेने शहरातील क्रांती चौक ते शिवाजी चौक, वरूर रस्ता, जामा मज्जीद, मोची गल्ली या महत्वाच्या भागात अतिक्रमणधारकांना दीड महिन्यांपूर्वी नोटीस बजावल्या होत्या.

YouTube video player

त्या अनुषंगाने काही व्यावसायिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेत स्वतःहून अतिक्रमण हटविले. मात्र, काही काहींनी अतिक्रमण हटविले नाही. त्यामुळे मुख्याधिकारी घाडगे स्वतः रस्त्यावर उतरल्या. जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. दरम्यान, अनेकांनी स्वतः अतिक्रमण हटवले.

उर्वरित अतिक्रमण धारकांनी स्वतःहून अतिक्रमण तात्काळ काढून प्रशासनास सहकार्य करावे. अतिक्रमण दूर होताच शहरातील प्रमुख रस्त्याचे व साईड गटारीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी शहरवासीयांनी व अतिक्रमणधारकांनी नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे.
विजया घाडगे, मुख्याधिकारी, शेवगाव नगरपरिषद

रस्त्याच्या बाजुची अतिक्रमणे काढल्यामुळे व या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी भरणारा आठवडा बाजार बंद केल्याने वाहतुकीची कोंडी कमी झाली आहे. मात्र पार्किंग सुविधा नसल्याने अनेक वाहने या रस्त्याच्या बाजूने उभे केलेले असतात. यामुळे अतिक्रमणे काढूनही काही रस्ते जैसे थे दिसत आहेत.

ताज्या बातम्या

सोनिया

काँग्रेस खासदार सोनिया गांधींची तब्येत अचानक बिघडली; रुग्णालयात दाखल

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiकाँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी त्यांची...