Tuesday, September 15, 2026
Homeक्राईमShevgaon : शेवगावमध्ये वेश्याव्यवसायावर कारवाई

Shevgaon : शेवगावमध्ये वेश्याव्यवसायावर कारवाई

तीन स्वतंत्र गुन्हे दाखल || आठ पीडित महिलांची सुटका

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgaon

शेवगाव शहरातील शिवनगर व नेहरूनगर परिसरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने सोमवारी (14 सप्टेंबर) धडक कारवाई केली. या कारवाईत तीन जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, आठ पीडित महिलांची सुटका करण्यात आली. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक हमीद चाँद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईसाठी तीन पथके तयार करण्यात आली होती.

- Advertisement -

शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसायाबाबत माहिती घेत असताना शिवनगर परिसरात निर्मला भाऊसाहेब कदम, नेहरूनगर परिसरात शबाना शरीफोद्दीन सय्यद आणि शिवनगर परिसरात अभिनव नंदु अंधारे हे वेगवेगळ्या ठिकाणी महिलांकडून वेश्याव्यवसाय चालवत असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पंचांसमक्ष बनावट ग्राहक पाठवून संबंधित ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री करण्यात आली. ़त्यानंतर तीनही ठिकाणी एकाचवेळी छापा टाकून संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत निर्मला कदम हिच्यावरील कारवाईतून तीन, शबाना सय्यद हिच्यावरील कारवाईतून तीन, तर अभिनव अंधारे याच्यावरील कारवाईतून दोन अशा एकूण आठ पीडित महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

निर्मला भाऊसाहेब कदम (वय 50, रा. शिवनगर, शेवगाव), शबाना शरीफोद्दीन सय्यद (रा. नेहरूनगर, शेवगाव) आणि अभिनव नंदु अंधारे (वय 36, रा. शिवनगर, शेवगाव) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, अनंत सालगुडे, संदीप दरवडे तसेच पोलीस अंमलदार शकील शेख, समीर सय्यद, अर्चना काळे, भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे, अरविंद भिंगारदिवे, योगेश भिंगारदिवे, विष्णू भागवत, बाळासाहेब गुंजाळ, अमृत आढाव, किरण ठुबे, सुनील पवार, शामसुंदर जाधव, अभिजीत अरकल, दीपक जाधव, सुनीता पवार, बाळासाहेब खेडकर, राहुल द्वारके, सागर ससाणे, रोहित येमुल, बाळासाहेब नागरगोजे, अशोक लिपणे, रिचर्ड गायकवाड, भीमराज खर्से, पंकज व्यवहारे, योगेश कर्डीले व चिमा काळे यांनी केली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नगर शहरात श्रींची उत्साहात प्रतिष्ठापना

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शनिवारी रात्रीच्या भूरभूर पावसानंतर रविवारी मिळालेली उघडीप आणि उन्हाच्या कडाक्यात सोमवारी सकाळी 11 नंतर नगर शहरासह संपूर्ण ग्रामीण भागात घरगुती व सार्वजनिक...