Tuesday, September 8, 2026
HomeनगरAhilyanagar : शेवगावचे डिवायएसपी पाटील पैठणला, कर्जतला लोखंडे

Ahilyanagar : शेवगावचे डिवायएसपी पाटील पैठणला, कर्जतला लोखंडे

शेवगावसह अहिल्यानगर ग्रामीण उपअधीक्षक पद रिक्तच

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शेवगाव विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (पोलीस उपअधीक्षक) सुनील पाटील यांची पैठण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. मात्र त्यांच्या जागी अद्याप कोणाला नियुक्ती देण्यात आलेली नाही. तसेच रिक्त असलेल्या कर्जत विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारीपदी प्रवीणचंद्र लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गृह विभागाने राज्यातील 65 पोलीस उपअधीक्षक, सहायक पोलीस आयुक्त यांच्या बदलीचे आदेश गुरूवारी (31 जुलै) काढले.

- Advertisement -

अहिल्यानगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक संपत भोसले व कर्जत विभागाचे उपअधीक्षक विवेकानंद वखारे हे 30 जून रोजी सेवानिवृत्त झाल्याने दोन्ही पदे रिक्त झाली होती. त्यातील कर्जत विभागाच्या उपअधीक्षकपदी प्रवीणचंद्र लोखंडे यांना नियुक्ती देण्यात आली आहे. ते पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा येथे कार्यरत होते. दरम्यान, लोखंडे यांनी पोलीस निरीक्षक पदावर असताना अहिल्यानगर जिल्ह्यात नेवासा, कोपरगाव, कोतवाली पोलीस ठाण्यासह लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक म्हणून काम पाहिले आहे.

त्यांना पदोन्नती मिळाल्यानंतर त्यांची बदली खंडाळा येथे झाली होती. ते पुन्हा जिल्ह्यात बदलून आले आहेत. शेवगाव विभागाचे उपअधीक्षक पाटील यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची बदली पैठण येथे करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या जागी अद्याप कोणालाही नियुक्ती देण्यात आलेले नाही. दरम्यान, अहिल्यानगर ग्रामीण व पोलीस अधीक्षक कार्यालयातील गृह विभागाचे उपअधीक्षकपद रिक्त असून तेथे अद्याप कोणाला नियुक्ती देण्यात आलेली नाही.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : गावगाडा आता कुणाच्या हाती?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने जिल्ह्यातील 753 ग्रामपंचायतींच्या कारभाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. निवडणुका होईपर्यंत गावांचा कारभार सुरळीत चालावा, यासाठी नियुक्त करण्यात...