Monday, May 4, 2026
Homeक्राईमCrime News : शेवगाव पोलिसांचे ‘ऑलआऊट ऑपरेशन’

Crime News : शेवगाव पोलिसांचे ‘ऑलआऊट ऑपरेशन’

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

शेवगाव पोलीसांनी आगामी शेवगाव नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था बिघडू नये आणि निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलीस स्टेशन हद्दीत ऑलआऊट ऑपरेशन राबवले. यादरम्यान शेवगाव शहरात आर्म्स अ‍ॅक्ट अंतर्गत कारवाई करून एक तलवार जप्त करण्यात आली. पाच ठिकाणी अवैध दारू धंद्यावर छापा टाकून 11 हजार 265 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच तीन जुगार अड्ड्यांवर छापा टाकून 11 हजार 300 रुपये किंमतीचे जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त करण्यात आली. अवैध मावा विक्री करणार्‍यांवर कारवाई करून 5 हजार किंमतीची सुगंधीत तंबाखू व मावा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले.

- Advertisement -

एका आरोपीवर मुंबई पोलीस अधिनियम कलम 122 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. बेलेबल वॉरंटमधील एकूण 8 आरोपींना वॉरंटची बजावणी करण्यात आली आहे. न्यायालयाकडून प्राप्त झालेल्या 19 साक्षीदार व आरोपींना समन्स बजावण्यात आले आहे. पोलीस स्टेशनच्या अभिलेखांवर असलेले 6 हिस्ट्रीशीटर आरोपी तपासण्यात आले आहेत. शेवगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे नाकाबंदी करून निवडणुकीच्या अनुषंगाने वाहने तपासण्यात आली आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, 4 पोलीस अधिकारी व 25 पोलीस अंमलदार यांनी ऑलआऊट ऑपरेशन दरम्यान केली आहे. दरम्यान, नगरपरिषद निवडणूक शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस योग्य त्या उपाययोजना करत आहेत. यापुढेही अशाच प्रकारच्या कारवाई करण्यात येतील, असे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

बारामती पोटनिवडणुकीची उद्या मतमोजणी; प्रशासनाची जय्यत तयारी

0
बारामती | बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी मतदान पार पडले असून, या निवडणुकीची मतमोजणी उद्या सोमवारी (दि.४) महाराष्ट ्र राज्य सकाळी ८ वाजेपासून सुरू...