Saturday, July 27, 2024
Homeनगरशेवगाव तालुक्यात पुढार्‍यांना गावबंदी

शेवगाव तालुक्यात पुढार्‍यांना गावबंदी

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

तालुक्यातील भाविनिमगाव येथे सकल मराठा समाजाच्यावतीने गावाच्य चौकात सर्व पक्षीय राजकीय पुढार्‍यांना गावबंदी करण्यात आली. याचा फलक गावाच्या वेशीवर लावण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही पक्षाच्या नेत्यांना गावात येऊ देणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. चुलीत गेले नेते, चुलीत गेला पक्ष; मराठा आरक्षण हेच आमच लक्ष असा मजकूर फलकावर आहे.

- Advertisement -

प्रस्थापित राज्यकर्ते हे मराठ्यांची उधड बाजू कधीच घेताना दिसले नाही आणि अजूनही दिसत नाहीत. त्यांना मतांची भीती वाटते म्हणून ते आपल्या बाजूने येत नाहीत. राजकीयदृष्ट्या मराठे जागे असतात. पण, त्यांना मतदार म्हणून देखील जागे होणे गरजेचे आहे. नव्या राजकीय पर्याय देखील उभा केला पाहिजे. तरच हे सर्व प्रस्थापित पक्ष वठणीवर येथील हे कळल्याने आणि मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या प्रेरणेने प्रेरित व हक्काच्या आरक्षणासाठी ते देत असलेल्या लढाईस पाठिंबा म्हणून तालुक्यातील भाविनिमगाव येथील सकल मराठा समाजाने सर्व आजी-माजी राजकीय पुढार्‍यांना गावबंदी करून जिल्ह्यात सर्वप्रथम पुढाकार घेतला आहे.

गुरुवार (दि.19) पासून तसे बोर्ड सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला असून लवकरच त्याचे लोन जिल्हा भर पोचणार असा दावा येथील सकल मराठा समाजाने केला आहे. भावीनिमगाव येथील सकल मराठा समाजाने जालना येथील सराटी येथे झालेल्या मोर्चात सर्वात जास्त युवकांनी गाड्यांचा मोठा ताफा घेऊन सहभाग नोंदविला होता. भावीनिमगाव सकल मराठा समाज हाकेला धावणारा आहे. सध्या मराठा भूषण म्हणून जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षण लढ्यात सकल मराठा समाज मोठ्या प्रमाणावर सक्रिय सहभागी आहे. त्याचे एक उदाहरण म्हणजे भाविनिमगाव पाठोपाठ आता मजलेशहर, मठाचीवाडी येथे ही आरक्षण लढाई तीव्र करण्याच्यादृष्टीने सर्वच राजकीय पुढार्‍यांना गावबंदी घातली आहे. या गावचे गावबंदचे लोण परिसरातील काही गावांत पसरले आहे.

भावीनिमगाव परीसरातील गावामधील लोकांनी सर्वपक्षीय पुढार्‍यांना गांवबंदी करा. या अगोदर देखील नगरला मराठा क्रांती मोर्चात सर्वात जास्त भावीनिमगावकर उपस्थित होते. अंतरवाली सराटी येथे देखील 30 गाड्या मार्चात सहभागी झाल्या होत्या.

– प्रा. नंदकुमार शेळके, भावीनिमगाव.

- Advertisment -

ताज्या बातम्या