Sunday, April 27, 2025
Homeनगरशेवगाव तालुक्यात 56 हजार हेक्टरवर पेरण्या

शेवगाव तालुक्यात 56 हजार हेक्टरवर पेरण्या

शेवगाव |शहर प्रतिनिधी| Shevgav

तालुक्याचे खरीप हंगाम उद्दिष्टाचे क्षेत्र 84 हजार 902 हेक्टर क्षेत्र असून तालुक्यात आज अखेर 56 हजार हेक्टर म्हणजे उद्दिष्टाच्या सुमारे 61 टक्के पेरणी झाल्याची माहिती तालुका कृषी कार्यालयातून सांगण्यात आली. परंतु पावसाने ओढ दिल्यान शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

- Advertisement -

शेवगाव तालुक्यात गेल्या 10 -12 दिवसांपासून पावसाने डोळे वटारल्याने खरीप पिकाची वाढ खुंटल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गेल्या महिन्यात तालुक्याच्या विविध मंडळात पावसाने हजेरी लावली. काही मंडळात समाधानकारक तर अनेक मंडळांत जेमतेम पावसाची नोंद झाली. तरीही नजीकच्या काळात चांगला पाऊस होईल या आशेने खरीप पेरणीला वेग दिला.

मागील हंगामात कपाशीला 10 हजारांपर्यंत भाव मिळेल अशी आशा शेतकर्‍यांना लागून राहिली होती. मात्र कपाशीला प्रतवारीनुसार 7 ते 8 हजार प्रति क्विंटल भाव मिळाला. तरीही यंदाच्या खरीप हंगामात आज अखेर जवळपास 42 हजार हेक्टर क्षेत्रात कपाशी लागवड झाली आहे. त्या खालोखाल तूर 7 हजार 300 हेक्टर, सोयाबीन 85, उडीद 45, मूग 34 आदी पिकांची पेरणी झाली आहे. सध्या ही पिके पाण्यावर आली असताना पाऊस गायब झाल्याने पिकांची वाढ खुटली आहे.

तालुक्याची जीवन रेखा म्हणून ओळख असणार्‍या जायकवाडी जलाशयाचा पाणीसाठा 27 टक्क्याच्या आसपास खाली आल्याने तालुक्यातील दहिगाव- ने, मुंगी पट्ट्यातील बागायती क्षेत्रातील खरीप पिकांसह फळबागा देखील अडचणीत सापडल्याने शेतकर्‍यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वांना जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. येत्या दोन चार दिवसांत पाऊस झाला नाही तर खरीप पेरण्या वाया जाण्याची शक्यता व्यक्त होत असून शेतकर्‍यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे ठाकण्याचे शेतकर्‍यांकडून बोलले जात आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...