Saturday, July 27, 2024
HomeनाशिकNashik Gram Panchayat Election Result : मोडाळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिल्पा आहेर; राष्ट्रवादीच्या...

Nashik Gram Panchayat Election Result : मोडाळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिल्पा आहेर; राष्ट्रवादीच्या गोरख बोडकेंनी सत्ता राखली

नाशिक | Nashik

नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका (Elections of Gram Panchayats) जाहीर झाल्यानंतर ४८ पैकी ०३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. त्यानंतर काल ४५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच १५ ग्रामपंचायतीमधील सरपंच आणि सदस्यांच्या रिक्त जागांसाठी मतदान (Voting) पार पडले होते. त्यानुसार साडेपाच वाजेपर्यंत जिल्ह्यात ८२.३५ टक्के मतदान झाले होते.त्यानंतर आज सकाळपासून विविध केंद्रांवर मतमोजणी सुरु असून विजयी उमेदवारांची नावे समोर आली आहेत…

- Advertisement -

यामध्ये जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) सर्वात प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या मोडाळे ग्रामपंचायतीच्या (Modale Gram Panchayat) सरपंचपदी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जिल्हाप्रमुख गोरख बोडके (Gorakh Bodke) यांची भाची शिल्पा किसन आहेर ३४ मतांनी विजयी झाल्या आहेत. याठिकाणी गोरख बोडके यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. आहेर यांनी केशव बोडके यांचा पराभव केला. तर शिरसाठे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनिता दत्तू सदगीर २४४ मतांनी विजयी झाल्या आहेत.

तसेच कुशेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अपक्ष उमेदवार एकनाथ गुलाब कातोरे विजयी झाले आहेत. तसेच धारगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अपक्ष उमेदवार रेश्मा पांडुरंग पुंजारा विजयी झाल्या आहेत. याशिवाय ओंडली ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचा झेंडा फडकला असून याठिकाणी सरपंचपदी प्रकाश वाळू खडके विजयी झाल्या आहेत. तर कृष्णनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अपक्ष उमेदवार वैशाली सचिन आंबावने विजयी झाल्या आहेत. 

Gram Panchayat Election : नाशिक जिल्ह्यातील ‘या’ ग्रामपंचायतींचे निकाल हाती; पाहा विजयी सरपंच,सदस्यांची यादी

तर टाके घोटी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेना ठाकरे गटाच्या माधुरी आडोळे विजयी झाल्या आहेत. याशिवाय घोटी खुर्द ग्रामपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा फडकला असून याठिकाणी सरपंचपदी माणिक निवृत्ती बिन्नर विजयी झाले आहेत. याशिवाय त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिंदे गटाचे काशिनाथ वळवी विजयी झाले असून सापगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शरद पवार गटाचे भीमा भास्कर दिवे विजयी झाले आहेत. तर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सोमनाथनगर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंगल मोहन बेंडकोळी यांची निवड झाली आहे. 

तसेच निफाड तालुक्यातील पोटनिवडणुकीत मनसेचा झेंडा फडकला असून येथील जव्हाळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संगीता कैलास गायकवाड ५५८ मतांनी विजयी झाल्या आहेत. तर नाशिक मालेगाव मांजरे ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आली असून याठिकाणी सरपंचपदी सीमा अनिल निकम विजयी झाल्या आहेत. तर नाशिक तालुक्यातील जलालपूर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा झेंडा फडकला असून याठिकाणी सरपंचपदी भगवान गबाले विजयी झाले आहेत.

Chhagan Bhujbal : छगन भुजबळांचे ‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर स्पष्टीकरण; म्हणाले…

त्याबरोबरच नाशिक तालुक्यातील पिंपळगाव गरुडेश्वर ग्रामपंचायतीत बाळू वाळू डंबाळे (शरद पवार गट) विजयी झाले असून बागलाण तालुक्यातील भवाडे ग्रामपंचायतीत अनिल तुळशीराम मोरे विजयी झाले आहेत. तर इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो ग्रामपंचायतीत ठाकरे गटाच्या अनिता राक्षे विजयी झाल्या आहेत. तसेच नाशिक तालुक्यातील सुभाषनगर ग्रामपंचायतीवर अपक्षांचा झेंडा फडकला असून याठिकाणी अपक्ष उमेदवार मनीषा फसाळे सरपंचपदी विजयी झाल्या आहेत. याशिवाय सटाणा तालुक्यातील चिराई ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपच्या शकुंतला पाटील विजयी झाल्या आहेत. तर इगतपुरी तालुक्यातील दौंडत ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी कॉंग्रेसचे पांडू मामा शिंदे विजयी झाले आहेत.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Gram Panchayat Election Result : दत्तनगरमध्ये ससाणे गटाने सत्ता राखली, सरपंच पदी सारिका कुंकलोळ

- Advertisment -

ताज्या बातम्या