Saturday, March 29, 2025
Homeमनोरंजनशिल्पा शिरोडकर ठरली करोना लस घेणारी पहिली अभिनेत्री

शिल्पा शिरोडकर ठरली करोना लस घेणारी पहिली अभिनेत्री

मुंबई । Mumbai

जगभर थैमान घालणाऱ्या करोना विषाणूच्या कहर नष्ट करण्यासाठी अखेर लस आली आहे. त्यामुळे अखेर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला असून, भारतात लवकरच लसीकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.

- Advertisement -

पण सुरुवातीला सर्व ठिकाणी लसीकरणाची रंगीत तालीम अर्थात ड्राय रन पार पडत आहे. पण ही बातमी ड्राय रनची नसून पण कोरोनाची लस घेणाऱ्या पहिल्या भारतीय अभिनेत्रीची आहे. गोपी किशन , हम बेवफा सनम ,खुदा गवाह अशा अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाची चाप पाडणारी अभिनेत्री शिल्पा शिरोडकर कोरोना लस घेणारी पहिली अभिनेत्री ठरली आहे.

अर्थात तिने ही लस भारतात नाही तर थेट दुबईतून घेतली आहे. लस घेतल्यानंतरचा आपला अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. शिल्पाने लस घेतल्याची माहिती आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या फोटोत शिल्पाने चेहऱ्यावर मास्क लावला आहे. तिच्या हातावर लस टोचल्याजागी पट्टी लागलेली दिसते.

व्हॅक्सिनेटेड अँड सेफ मी येतेय २०२१ असे फोटो शेअर करताना तिने लिहिले आहे शिल्पाचा हा फोटो सध्या वेगाने व्हायरल होतोय.

आतापर्यंत कोणत्याही भारतीय अभिनेत्रीने कोरोनाची लस घेतलेली नाही. शिल्पा शिरोडकर दीर्घ काळापासून बॉलिवूड मधून गायब आहे. २००० मध्ये तिने लग्न केले त्यानंतर ५ वर्षे ती भारतात होती. लग्नांनंतर ती आपल्या पतीसोबत दुबईत वास्तव्यास आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

IPL 2025 GT vs MI : आज मुंबई इंडियन्स-गुजरात टायटन्स भिडणार;...

0
मुंबई | Mumbai इंडियन प्रीमियर लीग (IPL) क्रिकेट स्पर्धेमध्ये आज (शनिवारी) गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघासमोर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचे आव्हान असणार आहे. हा...