Friday, May 24, 2024
Homeमुख्य बातम्याशिंदे गटाकडून सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली

शिंदे गटाकडून सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली

मुंबई । Mumbai

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुकारलेल्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) अल्पमतात आले आहे. त्यातच आता शिंदे गटाकडून (Shinde group) सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या असून विधानसभेचे उपाध्यक्ष (Deputy Speaker Legislative Assembly) नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांना शिंदे गटाकडून पत्र प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे…

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाकडून प्राप्त झालेल्या पत्रावर सर्व ४२ आमदारांच्या (mla) स्वाक्षऱ्या आहेत. यामध्ये शिवसेनेच्या ३५ आणि ७ अपक्ष आमदारांचा समावेश आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत हे सर्व आमदार गुवाहाटी (Guwahati) येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये (Radisson Blu Hotel) असल्याने महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत आले आहे.

दरम्यान, सत्ता स्थापनेसाठी शिंदे गटाला पक्षांतर बंदीच्या कायद्यामुळे (Prohibition of Migration Act) दोन तृतियांश (३६) आमदार असणे गरजेचे होते. त्यानंतर आता शिंदे गटाने ही सदस्य संख्या पूर्ण केली आहे .

- Advertisment -

ताज्या बातम्या