Friday, May 3, 2024
Homeनगरशिंदे-फडणवीस सरकारकडून वेदांता प्रकल्प गुजरातला भेट म्हणून दिला

शिंदे-फडणवीस सरकारकडून वेदांता प्रकल्प गुजरातला भेट म्हणून दिला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करीत, आमदारांवर दबाव टाकून, पैशांचे आमिष दाखवून, नैतिकता खुंटीला टांगून राज्यातील नवे सरकार अस्तित्वात आले आहे. 50 खोक्यांच्या बदल्यात महाराष्ट्राला धोके देत राज्यातल्या ईडी (एकनाथ-देवेंद्र) सरकारने वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला भेट म्हणून दिला असल्याचा घाणाघाती आरोप शहर काँग्रेसने केला आहे.

- Advertisement -

तसेच नगरच्या लालटाकी येथे काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिंदे – फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी रस्त्यावर उतरले होते. यावेळी ढोकळा न फाफडो, वेदांता प्रोजेक्ट आपडो, 50 खोके, मजेत बोके, 50 खोके, महाराष्ट्राला धोके.. ईडी सरकारचा, धिक्काचे फलक झळकवण्यात आले.

यावेळी महिला जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, माजी नगरसेवक फैयाज शेख, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते पाटील, अनिस चुडीवाला, अभिनय गायकवाड, हनीफ शेख, माजी मनपा विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, गणेश आपरे, मोहनराव वाखुरे, निजाम जहागीरदार, प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, दिगंबर रोकडे, पांडुरंग भांडवलकर, इम्रान बागवान, आकाश आल्हाट, हनीफ जहागीरदार, इंजि. सुजित क्षेत्रे, गौरव कसबे, मनोज वाळके, मोसीन शेख, रवि राठोड, अश्विन पानपाटील, संदीप माने, विशाल घोलप, स्वप्नील पाठक, जरीना पठाण, डॉ.जाहिदा शेख, अमृता कानवडे, मोमीन मिनाज पूनम वनमम ज्योती साठे कल्पना देशमुख शैला लांडे अर्चना पाटोळे अरुणा आंबेकर, इंदुमती ढेपे, उमेश साठे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या