मुंबई | Mumbai
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्यात दसरा मेळाव्याला (Shivsena Dasara Melava 2022) गर्दी जमवण्यावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. दोन्ही गटांकडून पदाधिकाऱ्यांना गर्दी जमवण्याचे टार्गेट देण्यात आले आहे.
अशातच आता शिंदे गटाने (Shinde Group) दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी बाळासाहेबांचा आवाज वापरून जबरदस्त खेळी करत उद्धव ठाकरेंची कोडीं करण्याचा प्रयत्न केला आहे…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दसरा मेळाव्याचा पहिला टीझर आपल्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे या टीझरमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा (Balasaheb Thackeray) आवाज वापरण्यात आला आहे.
या मेळाव्याचा उल्लेख ‘शिवसेनेचा दसरा मेळावा’ असा करण्यात आला आहे. टीझरच्या सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) अश्वारुढ मूर्ती दिसत आहे. त्यानंतर बाळासाहेबांचा मूर्ती आणि शेवटी एकनाथ शिंदेंची मूर्ती सदृश्य प्रतिमा दिसते.
तसेच व्हॉइस ओव्हरमध्ये बाळासाहेबांच्या आवाजात, ”शिवरायांचा भगवा झेंडा, शिवसेनेचा भगाव झेंडा, हिंदू धर्माचा भगवा झेंडा सतत, सतत आणि सातत्याने आस्मानात फडकत राहिला पाहिजे”, हे वाक्य ऐकू येते. तसेच शेवटी, ”जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम्” हे सुद्धा बाळासाहेबांच्या आवाजातच ऐकू येत आहे. तर ”एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य”, अशी ओळ त्यानंतर झळकतांना दिसत आहे.
तर मुख्यमंत्र्यांच्या फोटोजवळच ‘एकलव्य’ हा शब्द झळकतांना दिसत आहे. त्याचबरोबर शिवसेनेची ओळख असणारा डरकाळी फोडणारा वाघ आणि त्याच्या बाजूला, ”गर्व से कहो हम हिंदू हैं” हे वाक्यही टीझरमध्ये दिसत आहे. त्याचप्रमाणे, ”शिवसेनेचा दसरा मेळावा हिंदवी तोफ पुन्हा धडाडणार…”अशा ओळीही या टीझरमधील फोटोवर दिसत आहे.




