मुंबई | Mumbai
शिवसेनेचे संस्थापक दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray Mueseum) यांच्या स्मारकासंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Raj Thackeray-Uddhav Thackeray) यांची भेट होणार असल्याच्या चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहेत. दोन्ही ठाकरे बंधू भेटणार असल्याने वेगवेगळ्या राजकीय चर्चांना आत्तापासूनच सुरुवात झाली आहे.
त्यावेळी दोघांमध्ये एकत्र येण्यासंदर्भात बोलणी होऊ शकते, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर शिंदे गटाने (Shinde Group) प्रतिक्रिया देताना आम्ही मागेच उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंशी बोलणी करून युती करूया, असे सांगत होतो, असे म्हटले आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
“…इसलिए बढाई है, मैंने अपनी दाढी”; आठवलेंच्या कवितेवर शाहांना हसू आवरेना
आजची परिस्थिती कशीही असो, राज ठाकरे गेल्या १४ वर्षांपासून त्यांचा पक्ष चालवत आहेत. त्यांच्या ताकदीने ते पक्ष चालवत आहेत. त्यांनाही बराच त्रास दिला गेला आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वापरायचा नाही, प्रबोधनकार ठाकरे यांचा फोटो वापरायचा नाही. राज ठाकरे त्यांना झालेला त्रास विसरणार नाहीत, असे सांगताना, अशा अनेक कारणांमुळे ठाकरे गट आणि मनसेची युती होईल, असे वाटत नाही, असे मत शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी म्हटले आहे.
स्वाभिमानीचा रविकांत तुपकरांना अल्टीमेटम; पुण्यात झालेल्या बैठकीत घेतला निर्णय
दरम्यान, शिरसाट असे ही म्हणाले की, आम्ही २०१४ ला (शिवसेना पक्ष एकसंघ असताना)जेव्हा शिवसेना-भाजपा युती नव्हती, तेव्हा आम्ही बोललो होतो. आपली भाजपाबरोबर युती होत नाहीये ना, मग आपण राज ठाकरे यांच्याशी बोलायला हवे. मनसेशी युती करण्याबाबत विचारणा केली होती. परंतु, तेव्हा ते (उद्धव ठाकरे) आम्हाला म्हणाले, का बोलायचे? कशासाठी बोलायचे? ज्यांना तिकडे जायचेय ते जाऊ शकतात.
पुढे ते असे ही म्हणाले की, दोन्ही भाऊ एकत्र येणे आनंदाची गोष्ट आहे. परंतु स्वतःचे काही द्यायचे नाही, ही जी त्यांची (ठाकरे गट) वृत्ती आहे, त्यामुळे दोन पक्ष एकत्र येतील असे मला वाटत नाही. राज ठाकरे यांचे व्यक्तिमत्व वेगळे आहे. ते खूप दिलदार आहेत. ते एखाद्या वेळी असा निर्णय घेऊ शकतात. परंतु, यांच्या बाजूचे (उद्धव ठाकरे यांच्या बाजूचे) बगलबच्चे असा काही निर्णय घेऊ देणार नाहीत, असे ही शिरसाट म्हणाले.