Saturday, May 18, 2024
Homeनाशिकशिंदे टोल नाक्यावर आयकर विभागाचा छापा

शिंदे टोल नाक्यावर आयकर विभागाचा छापा

नाशिक रोड |प्रतिनिधी| Nashik

वादग्रस्त ठरत असलेला नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे गावाजवळ असलेल्या टोल नाक्यावर आज आयकर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी छापा टाकून तेथील कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे या छाप्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून अद्यापही तपासणी सुरू असल्याचे समजते.

- Advertisement -

नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे गाव येथील टोल नाका हा गेल्या अनेक दिवसापासून चर्चेचा विषय बनला आहे या टोलनाक्याबाबत अनियमीतता असल्याच्या संशयावरून आयकर विभागाच्या दहा ते बारा जणांच्या पथकाने आज छापा टाकून तपासणी सुरू केली आहे. राज्यातील अनेक टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालतो या विरोधात अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आवाज उठविला परंतु टोलनाक्यावरील गैरव्यवहार थांबलेला नाही टोल नाक्यावर प्रचंड प्रमाणात वसुली केली जाते पण वाहन चालकांना मात्र सुविधा मिळत नाही रस्त्यावरील खड्डे अपघाताला निमंत्रण देतात परंतु टोल प्रशासन याकडे दुर्लक्ष करते.

टोल नाक्यावरील गैरव्यवहार संदर्भात राजकीय पक्षांनी आवाज उठविला त्याचप्रमाणे गेल्याच महिन्यात मनसेच्या वतीने टोल नाक्यावर जी वसुली करण्यात येते त्याचे पैसे जातात कुठे याबद्दल आवाज उठविण्यात आला परिणामी यानंतर राज्य शासनाने टोलनाक्यावर सीसीटीव्ही लावून रोज किती वाहने जातात व येतात याबाबतची तपासणी सुरू केली आहे तसेच मनसेच्या वतीने सुद्धा मुंबईतील काही टोल नाक्यावर सीसीटीव्ही लावण्यात आले आहे दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आयकर विभागाने येथील शिंदे टोल नाक्यावर छापा टाकून तेथील कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांचे मोबाईल सुद्धा जप्त करण्यात आले असून चौकशी करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या