Saturday, October 3, 2026
Homeक्राईमCrime News : कर्जत तालुक्यातील शिंदे येथे तरुणाची निर्घृण हत्या

Crime News : कर्जत तालुक्यातील शिंदे येथे तरुणाची निर्घृण हत्या

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

तालुक्यातील शिंदे गावामध्ये हनुमंत गोरख घालमे (वय 35) याचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात टणक वस्तूने वार करून निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

बापू झुंबर घालमे (रा. शिंदे, ता. कर्जत) यांनी कर्जत पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, फिर्यादीला मंगळवारी (दि. 6) सकाळी सुमारे सात वाजता पोलीस पाटील आप्पा घालमे यांचा फोन आला. त्यांनी हनुमंत घालमे याला कोणीतरी मारहाण केल्याची माहिती देत तत्काळ त्याच्या घरी जाऊन पाहण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादी हनुमंत घालमे यांच्या घरी गेले असता, तेथे सोजरबाई घालमे, जालिंदर घालमे, अशोक घालमे, बबन घालमे यांच्यासह इतर ग्रामस्थ जमलेले होते. हनुमंत घालमे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला.

सोजरबाई घालमे यांनी सांगितले की, दि. 6 रोजी मध्यरात्री सुमारे एक वाजण्याच्या सुमारास हनुमंत घालमे यांच्या शेडमधून एक शेळी व दोन करडे आमच्या घरी आले होते. ही बाब सांगण्यासाठी जालिंदर बापू घालमे हे हनुमंतकडे गेले होते; मात्र घराचे कंपाउंड गेट बंद असल्याने ते परत आले. त्यानंतर सकाळी साडेसहाच्या सुमारास ते पुन्हा हनुमंत यांच्या घरी गेले असता गेट उघडे होते. आवाज दिल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने घरात पाहिले असता हनुमंत घालमे हा मृतावस्थेत आढळून आला. त्यानंतर ही माहिती गावचे पोलीस पाटील यांना देण्यात आली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे, पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट तसेच पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोराडे यांनी घटनास्थळी भेट दिली. तपासासाठी डॉग स्कॉड पथकाला पाचारण करण्यात आले असून फिंगरप्रिंट तज्ज्ञांकडून ठसे घेण्यात आले आहेत. अधिक तपास कर्जत पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

default-featured-image

Nashik News : जन्मानंतर काही तासांतच बाळाचा मृत्यू; शववाहिका न मिळाल्याने...

0
नाशिक | Nashik त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka) टाके देवगाव येथील नवजात बाळाचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर रुग्णवाहिका न मिळाल्याने आई-वडीलांना मृतदेह तब्बल ६० किलोमीटर प्रवास...