मुंबई | Mumbai
आगामी नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यासाठी निवडणुक स्टार प्रचारकांची यादी जाहीर करणे असो किंवा निवडणुक प्रभारींची यादी जाहीर करणे असो. बुधवारी भाजपची स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली असून गुरवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून निवडणुक प्रभारींची यादी जाहीर करण्यात आली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी ही यादी जाहीर केली असून नाशिक जिल्ह्यातील चांदवड, पिंपळगाव बसवंत, ओझर, येवला, सटाणा, नगरपरिषदांसाठी आमदार सुहास कांदे, किशोर दराडे आणि माजी आमदार धनराज महाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तर, मनमाड आणि नांदगाव नगर परिषदेसाठी आमदार सुहास कांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यासह, सिन्नर, भगुर, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर नगर परिषदेसाठी माजी खासदार हेमंत गोडसे आणि उपनेते विजय करंजकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




