Wednesday, April 2, 2025
Homeधुळेशिंदखेडा तहसीलदारांना धक्काबुक्की

शिंदखेडा तहसीलदारांना धक्काबुक्की

धुळे । प्रतिनिधी dhule

शिंदखेडा तालुक्यातील पाष्टे ते म्हळसर रस्त्यावर वाळू वाहतूक करणार्‍या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरला पकडण्यात आले. त्याचा राग येवून तिघांनी तहसीलदारांसह त्यांच्या वाहन चालकाला धक्काबुक्की केली. तसेच ट्रॅक्टरही पळवून नेले. याप्रकरणी नरडाणा पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

- Advertisement -

याबाबत तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे (वय 42 रा. शिंदखेडा) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांनी काल दि.18 रोजी पाष्टे ते म्हळसर रस्त्यावर एका निळ्या रंगाचे वाळू वाहतूक करणार्‍या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरला थांबविले. वाळु परवान्याबाबत विचारले असता ट्रॅक्टरवरील राहुल सुरेश कोळी, मनोज सुभाष जाधव व तुषार शालीक कोळी (रा. म्हळसर ता.शिंदखेडा) यांनी तहसीलदार सपकाळे व त्याच्या वाहनावरील चालकास धक्काबुक्की केली. ट्रॅक्टर पळवून नेत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यानुसार वरील तिघांवर भादंवि 353, 379, 505, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि सुरेश शिरसाठ हे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : आदिमायेच्या चैत्रोत्सवासाठी प्रशासन सज्ज; गडावर प्लास्टिक बंदी

0
नांदुरी | वार्ताहर | Nanduri आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर (Saptashrungi Gad) त्रिगुणात्मक स्वरूपी सप्तशृंगीमातेच्या चैत्रोत्सवास ५ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. त्यादृष्टीने नियोजनाबाबत आज...