Tuesday, September 29, 2026
Homeक्राईमBribery News : शिंगणापूर पोलीस ठाण्याचा एक कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात

Bribery News : शिंगणापूर पोलीस ठाण्याचा एक कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात

गाळा मालकाकडून लाच घेतल्याची चर्चा

सोनई |वार्ताहर| Sonai

शिंगणापूर पोलीस ठाण्यासमोरील गाळामालकाकडून तीन हजार रुपयांची लाच मागितल्याच्या तक्रारीवरून शिंगणापूर पोलीस ठाण्याचा एक कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. शिंगणापूर येथे पुजा साहित्याची खरेदी करता भाविकांची वाहने ठराविक दुकानात लावण्यासाठी दोन महिन्यांचे मिळून तीन हजारांची मागणी पोलीस कर्मचार्‍याने गाळा मालकाकडे केली व त्यातील दोन हजार रुपये देत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले.

- Advertisement -

पोलिसांकडून याप्रकरणी गुप्तता पाळली जात असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे खात्रीलायक समजले आहे. शिंगणापूर येथे भाविकांचे फसवणूकीचे प्रमाण वाढत असल्याने विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी भाविकांच्या सुरक्षा व सोयीच्या दृष्टीने कडक पावले उचलली व भाविकांना त्रासदायक ठरणार्‍या लटकूंचा बंदोबस्त करण्याची उपाययोजना केली होती.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक वाढली; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 5000 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची (Onion) मंगळवारी राहाता...