Tuesday, September 29, 2026
Homeक्राईमNewasa : शिंगवेतुकाई शिवारात वडाळा बहिरोबाच्या तरुणाकडून गावठी कट्टा हस्तगत

Newasa : शिंगवेतुकाई शिवारात वडाळा बहिरोबाच्या तरुणाकडून गावठी कट्टा हस्तगत

सोनई |वार्ताहर| Sonai

सोनई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिंगवे तुकाई परीसरातुन गावठी कट्टा (Gavathi Katta) बाळगणार्‍याला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवार दि 25 रोजी पकडले असून याप्रकरणी वडाळा येथील युवकावर सोनई पोलीस ठाण्यात (Sonai Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्र बाळगणार्‍यांची माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. सोनई पोलीस ठाणे हद्दीत शिंगवे तुकाई (Shingve Tukai) भागात परिसरात एक इसम गावठी कट्टा लावून फिरत असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने त्या ठिकाणी सापळा लावून प्रदीप मोहन जगधने रा. वडाळा बहिरोबा तालुका नेवासा (Newasa) याला पकडले असता त्याच्याकडून 30 हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल जप्त (Gavathi Katta Seized) करण्यात आले व त्याच्यावर सोनई पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल किशोर आबासाहेब शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून आर्म क्ट 3/25 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

सोनई पोलीस ठाणे हद्दीत गावठी कट्ट्यांचा सर्रास वापर होऊन धमक्यांसह खून झालेले आहेत गुन्हे शाखेच्या पथकाला गावठी कट्टे तर सापडत नाहीच पण आरोपीही सापडत नसल्याचे दिसून येते तत्कालीन पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश व विश्वास नांगरे यांच्या काळातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB Police) अनेक गुन्ह्यांचा तपास लावला व जिल्ह्यातील अवैध व्यवसायावर आळा घातला होता. सोनई, घोडेगाव, चांदा, शनिशिंगणापूर, वडाळा परिसरात गुन्हे शाखेच्या पथकाने घरात घसून गावठी कट्टे जप्त केले होते आताही तशीच कारवाईची मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.

परीसरात अनेक दिवसांपासून वादाच्या घटनेतून गावठी कट्ट्यांचा वापर झाला असतानाही कारवाई मात्र झाली नसल्याचे दिसते काही दिवसापूर्वी चांदा गावात गावठी पिस्तुलातून खून, अंमळनेर येथे विद्यार्थ्यांवर झालेला गोळीबार तसेच घोडेगाव येथे झालेल्या गोळीबारातून खून झालेले असताना प्रत्येकी एकेक आरोपी अटकेत तर अन्य आरोपी आजपर्यंत फरार आहेत. तपासी यंत्रणेसह गुन्हे शाखा पथक फक्त तपास सुरू असल्याचे सांगतात.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...