Monday, October 26, 2026
HomeनगरShirdi : शिर्डी विमानतळावरून उद्यापासून चार अतिरिक्त उड्डाणे सुरू

Shirdi : शिर्डी विमानतळावरून उद्यापासून चार अतिरिक्त उड्डाणे सुरू

हैदराबादसाठी विमानसेवा वाढल्याने ये-जा करणार्‍या विमानांची संख्या 12 वर

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangaon Deshmukh

कोपरगाव तालुक्यातील काकडी येथील शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रविवारपासून शिर्डी विमानतळाच्या विमानसेवेत आणखी चार नवीन उड्डाणांची भर पडत आहे. या विस्तारामुळे शिर्डी विमानतळावरून ये-जा करणार्‍या विमानांची संख्या आठवरून थेट बारावर पोहोचणार आहे. विशेषतः हैदराबाद मार्गावर दोन विमाने येणार आणि दोन विमाने रवाना होणार असल्यामुळे हैदराबादशी असलेला हवाई संपर्क अधिक मजबूत होणार आहे.

- Advertisement -

इंडिगो एअरलाइन्सद्वारे चालवल्या जाणार्‍या या विमानसेवेच्या नव्या वेळापत्रकानुसार हैदराबाद-शिर्डी: पहिले विमान सकाळी 8.10 वाजता, तर दुसरे विमान दुपारी 4 वाजता शिर्डीत दाखल होईल. शिर्डी-हैदराबाद: शिर्डीहून पहिले विमान सकाळी 8.30 वाजता, तर दुसरे विमान सायंकाळी 4.20 वाजता हैदराबादकडे उड्डाण करेल. या नव्या उड्डाणांसोबतच शिर्डीवरून देशातील इतर प्रमुख शहरांसाठी सुरू असलेली विमानसेवा कायम राहणार आहे. चेन्नई-शिर्डी: सकाळी 11.05 आगमन, शिर्डी-चेन्नई: सकाळी 11.40 प्रस्थान बंगळुरू-शिर्डी: दुपारी 12.30 आगमन, शिर्डी-बंगळुरू: दुपारी 1.00 प्रस्थान दिल्ली-शिर्डी: रात्री 8.10 आगमन, शिर्डी-दिल्ली: रात्री 8.45 प्रस्थान पर्यटन आणि व्यवसायाला मिळणार मोठी चालना शिर्डी हे जगभरातील प्रमुख धार्मिक पर्यटनस्थळ असून, साईबाबांच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात.

विमानफेर्‍यांमध्ये झालेल्या या वाढीमुळे साईभक्तांचा प्रवास अधिक सुकर व वेळेची बचत करणारा ठरणार आहे. हवाई संपर्काच्या विस्तारामुळे शिर्डीतील हॉटेल व्यवसाय, टॅक्सीचालक, पर्यटन क्षेत्र आणि स्थानिक व्यावसायिकांना मोठा आर्थिक लाभ होणार असून, कोपरगाव, राहाता व परिसरातील नागरिकांनाही याचा मोठा फायदा होणार आहे. भविष्यात इतरही प्रमुख शहरांसाठी अशाच प्रकारची विमानसेवा सुरू होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : आठवडाभर प्रचाराची रणधुमाळी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा बँकेच्या जनरलच्या सहा जागा आणि सोसायटी मतदारसंघातील चार अशा दहा जागांसाठी येत्या 2 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील...