Monday, March 31, 2025
HomeनगरShirdi News : शिर्डी विमानतळावरून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाईट लँडीगची गुढी

Shirdi News : शिर्डी विमानतळावरून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाईट लँडीगची गुढी

हैदराबादवरुन 56 प्रवाशी आले तर शिर्डीवरुन 75 प्रवाशी हैदराबादला रवाना

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh

कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे असलेल्या शिर्डी विमानतळावरुन रविवारी 30 मार्चपासून नाईट लँडीग सुरू झाली असून हैदराबादवरुन इंडीगो एअरलाईनचे विमान 56 प्रवाशांना घेऊन रात्री साडेनऊ वाजता शिर्डी विमानतळावर उतरले. तर रात्री 9 वाजून 50 मिनीटांनी शिर्डी विमानतळावरुन हैदराबादकडे 75 प्रवाशी घेऊन विमानाने उड्डाण केले.अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शिर्डी विमानतळावरुन नाईट लँडीगची गुढी उभारुन या विमानतळाने आणखी एक प्रगतीचे पाऊल टाकले आहे.

- Advertisement -

या विमानतळावर येणार्‍या प्रवाशांचे माजी खा. डॉ. सुजय विखे-पाटील व अधिकार्‍यांनी केक कापत एकमेकाला केक भरवत स्वागत केले आहे. विमानतळ प्रशासनाने रात्रीच्या विमानाने येणार्‍या व जाणार्‍या प्रवाशांच्या स्वागतासाठी आकर्षक विद्युत रोषणाई तसेच फुग्यांची सजावट केली होती. हैदराबाद वरून 7 वाजून 55 मिनीटाने 56 प्रवासी घेऊन इंडीगोचे 6 ई 7038 हे विमान शिर्डी विमानतळावर 9 वाजुन 30 मिनीटाने पोहचले.शिर्डी विमानतळावरुन 9 वाजुन 50 मिनीटाने 75 प्रवाशी घेऊन इंडीगोचे 6 ई 7039 हे विमान रात्री 11 वाजुन 25 मिनीटाने पोहचले. गेल्या आठ वर्षांपासुन नाईट लँडीगची साईभक्तांना प्रतिक्षा होती. नाईट लँडीग सुरु झाल्यामुळे या विमानतळाच्या विकासात नविन पाऊल ठरणार आहे.अनेक वेळेस नाईट लँडीगची घोषणा झाली मात्र प्रत्यक्षात सुरुवात झालीच नव्हती.

शिर्डी विमानतळ हे सुरु झाल्यापासुन प्रवाशांच्या सर्वाधिक पंसतीला उतरलेले विमानतळ आहे.सध्या या विमातळावरुन दिवसा 8 विमाने येतात तर 8 विमाने जातात अशा 16 फे-या या विमानतळावरुन सुरु आहे.महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने नाईट ल्रँडीगसाठी आवश्यक असलेले सर्व कामे पुर्ण करत केंद्राकडे परवानगी मागीतली होती. केंद्राच्या नागरी विमान वाहुतुक महासंचालनालयाने फेब्रवारी 23 मध्ये नाईट लँडीगला परवानगी दिली.त्यांनतर एप्रिल 23 मध्ये दिल्लीहून आलेल्या इंडीगो एअरलाइन्सचे रात्रीची पहिल्या विमानाची यशस्वी चाचणी झाली आणि या विमानतळाच्या विस्ताराचे आणि परिसराच्या प्रगतीचे एक नवे दालन खुले झाले होते.यशस्वी चाचणी नंतर दोन वर्षाने ही सेवा सुरु झाली आहे.

नाईट लँडिंग सुरु झाल्यानंतर काकडआरतीला उपस्थित राहू इच्छिणार्‍यांना रात्री प्रवास करुन येता येणार आहे. एकूणच भाविकांना मोठ्या सुविधा यामुळे निर्माण होणार आहेत. रात्रीच्या विमानसेवेमुळे या परिसराच्या विकासाला सुद्धा गती प्राप्त होणार आहे. शिर्डीत भाविकांच्या संख्येत सुद्धा मोठी वाढ यामुळे अपेक्षित आहे.सुरुवात हैदराबाद विमानसेवेने झाली असली तरी भविष्यात इतर ठिकाणीही रात्रीची विमानसेवा सुरु होईल.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ladaki Bahin Yojana : दीड हजार लाडक्या बहिणींच्या नावे चारचाकी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत राज्य सरकारकडून महिन्याला दीड हजार रुपयांचा लाभ घेणार्‍या जिल्ह्यातील महिलांची पडताळणी राज्य पातळीवरून सुरू करण्यात आली आहे. यासाठी...