Sunday, November 17, 2024
Homeनगरशिर्डी विधानसभा मतदारसंघात 192 मतदारांनी केले गृह मतदान

शिर्डी विधानसभा मतदारसंघात 192 मतदारांनी केले गृह मतदान

175 ज्येष्ठ नागरिक व 17 दिव्यांगांचा समावेश

राहाता |प्रतिनिधी| Rahata

शिर्डी विधानसभा मतदारसंघात 192 मतदारांनी गृह मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 85 वर्षांवरील 175 ज्येष्ठ नागरिक, 17 दिव्यांग मतदारांचा समावेश असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व मतदानापासून कोणीही मतदार वंचित राहू नये यासाठी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही 85 वर्षांवरील आणि मतदान केंद्रापर्यत पोहोचू न शकणार्‍या दिव्यांग मतदारांसाठी घरुनच मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली होती. यासाठी नमूना 12 डी भरून घरूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

- Advertisement -

शिर्डी विधानसभा मतदारसंघासाठी गृह मतदानासाठी 198 मतदारांनी नोंदणी केली होती. 14 ते 16 नोव्हेंबर या कालावधीत गृह मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. 14 नोव्हेंबर रोजी 98 मतदारांनी मतदान केले. यामध्ये 85 ज्येष्ठ नागरिक व 13 दिव्यांग मतदारांचा समावेश होता. 15 नोव्हेंबर रोजी 94 मतदारांनी मतदान केले. यामध्ये 90 ज्येष्ठ नागरिक व 4 दिव्यांग मतदारांचा समावेश होता. दोन दिवसांत 198 पैकी 192 जणांनी मतदान केले आहे. 4 जण मयत आहेत. 2 जण रूग्णालयात दाखल आहेत. केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व सूक्ष्म निरीक्षक यांचा समावेश असलेल्या 8 पथकांच्या माध्यमातून गृह मतदान मोहीम राबविण्यात आली.

गृह मतदानासाठी टपाली मतपत्रिकेचा वापर करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वयक अधिकारी जालिंदर पठारे, नायब तहसीलदार हेमंत पाटील, बाळासाहेब मुळे, मनोज भोसेकर यांच्या देखरेखीखाली मतदान प्रक्रिया राबविण्यात आली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या