Saturday, July 25, 2026
HomeनगरShirdi : शिर्डीत आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली साईभक्तांची लूट; पोलिसांची मोठी कारवाई

Shirdi : शिर्डीत आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली साईभक्तांची लूट; पोलिसांची मोठी कारवाई

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईनगरीत दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना विविध आमिषे दाखवून फसवण्याचे प्रकार नवे नाहीत. मात्र आता चक्क डोक्यावर केस येण्यासाठी खात्रीशीर आयुर्वेदिक औषध देण्याच्या बहाण्याने एका परप्रांतीय साईभक्ताला हजारो रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी तातडीने पावले उचलत चार संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील अनंतपुरम जिल्ह्यातील ताडीपत्र येथील रहिवासी गिरीशकुमार थंगपुर सत्यानारायण हे 12 फेब्रुवारी रोजी शिर्डीत दर्शनासाठी आले होते. मंदिराच्या परिसरात फिरत असताना एका महिलेने त्यांना गाठले आणि त्यांच्या डोक्यावरील टक्कल पाहून आमच्याकडे केस येण्याचे खात्रीशीर आयुर्वेदिक औषध आहे, असे सांगून त्यांना विश्वासात घेतले. त्यानंतर त्यांना ताजीम खान चौकातील एका आयुर्वेदिक दुकानात नेण्यात आले.

तेथे उपस्थित असलेल्या व्यक्तींनी गोड बोलून गिरीशकुमार यांना तीन औषधांच्या पुड्या दिल्या आणि औषधाचे 10 हजार रुपये व एजंट कमिशन म्हणून 1400 रुपये, असे एकूण 11 हजार 400 रुपये उकळले. काही वेळातच ही औषधे बोगस असून आपली फसवणूक झाल्याचे गिरीशकुमार यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून शिर्डी पोलिसांनी मनोज गोविंद शिर्के, मोना गोविंद शिके, राणी रतिलाल पखाले आणि एजंट राणी कनवार सडमोके (रा. श्रीरामपूर) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 318(4) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

शहरात बर्‍याच काळापासून अशा प्रकारचे गोरखधंदे सुरू असून अनेक भाविक यापूर्वीही या जाळ्यात अडकल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. शिर्डीत पहिल्यांदाच अशा अफलातून पद्धतीने फसवणूक झाल्याने भाविकांमध्ये संताप व्यक्त होत असून, अशा भामट्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.

ताज्या बातम्या

सरकार

“मुलांच्या संघर्षासमोर सरकार झुकले…”, आंदोलनानंतर अभिजीतच्या आईची पहिली प्रतिक्रिया

0
छत्रपती संभाजीनगर | Chhatrapati SambhajinagarNEET पेपरफुटी प्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या...