Thursday, June 18, 2026
HomeनगरShirdi : शिर्डीत नाताळनिमित्त भाविकांची गर्दी

Shirdi : शिर्डीत नाताळनिमित्त भाविकांची गर्दी

साई जयघोषाने साईनगरी दुमदुमली

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

नाताळ सणाच्या (Christmas Festival) सुरुवातीलाच शिर्डीमध्ये साईभक्तांची (Sai Devotees) मोठी गर्दी झाली असून साई जयघोषाने साईनगरी गजबजून गेली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही 25 डिसेंबरला नाताळच्या सुट्ट्या लागताच साईभक्त राज्यासह परराज्यातून विमान, रेल्वे, बस, खाजगी वाहनातून शिर्डीत (Shirdi) येत आहेत. नगर-मनमाड महामार्गावर साईभक्तांच्या वाहनांची मोठी वर्दळ वाढली आहे. त्यात सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतासाठी विविध राज्यातील अनेक भागातून पायी साई पालख्या व पदयात्री शिर्डीला येत आहेत.

- Advertisement -

नगर-मनमाड रस्त्याने (Nagar Manmad Highway) शिर्डीकडे अनेक पालख्या सध्या येत असून पदयात्रींची ही गर्दी वाढत आहे. शिर्डीमध्ये सुमारे 53 पालख्यांची नोंद झालेली आहे. साईबाबा संस्थानने निवासस्थानांबरोबरच साई धर्मशाळा, पाचशे व एक हजार रूम भक्त निवास तसेच विविध ठिकाणी भक्तांसाठी मंडप उभारले आहेत. शिर्डीमध्ये (Shirdi) हॉटेल, रेस्टॉरंट तसेच इमारतींवर आकर्षक विद्युत करण्यात आलेली आहे. शिर्डीत 25 डिसेंबर नाताळ सणाच्या दिवशी गुरुवार आल्यामुळे परिसरातील भाविकांनी देखील संपूर्ण दिवस साई दर्शनासाठी मोठी गर्दी (Crowd) केली होती.

साईभक्तांची या आठवड्यात शिर्डीमध्ये (Shirdi) मोठी गर्दी दरवर्षीप्रमाणे राहणार असल्याची शक्यता असल्याने आवश्यक पोलीस बंदोबस्त तसेच विविध साईभक्तांसाठी सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एकूणच सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठी गर्दी होत असून साईनगरी आकर्षक विद्युत रोषणाईने सजली आहे.

25 डिसेंबर नाताळ निमित्त शाळा व महाविद्यालय यांना आठ दिवस सुट्टी असल्याने शिर्डीत गुरुवारपासून भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसू लागल्याने नेहमीप्रमाणे वाहतूक शाखेच्या सावळा गोंधळामुळे वाहतुकीचे नियोजन पूर्णतः कोलमडून गेले होते. लक्झरी बसेसांना शहरात परवानगी नसताना नियमांची पायमल्ली करत अनेक लक्झरी बस वाहतुकीस अडथळा निर्माण करताना बघायला मिळाले. त्यामुळे गुरुवारी मोठ्या प्रमाणात महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. शिर्डीत भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने संस्थान प्रशासनाला देखील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : ‘बनावट मतपत्रिका’ व्हायरल झाली अन् गिते...

0
नाशिक | Nashik नाशिक विधानपरिषद निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election) एकूण ६१९ मतदारांपैकी ६१८ मतदारांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या नऊ मतदान केंद्रांवर (Voting Center) जाऊन मतदानाचा...