Thursday, March 13, 2025
Homeक्राईमCrime News: शिर्डी दुहेरी हत्याकांडाने हादरली! साई संस्थानच्या दोघांना चाकूनं भोसकत संपवलं

Crime News: शिर्डी दुहेरी हत्याकांडाने हादरली! साई संस्थानच्या दोघांना चाकूनं भोसकत संपवलं

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

सोमवारी पहाटे वेगवेगळ्या ठिकाणी लागोपाठ झालेल्या रस्ता लुटीतून डबल मर्डर व एक हाफ मर्डरने साईनगरी हादरली. दोन्ही आरोपी शिर्डीतील असून सराईत गुन्हेगार आहेत. यातील एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले असून दुसरा पसार झाला आहे.

- Advertisement -

पहाटे दोघा माथेफिरूंनी केलेल्या भीषण हत्याकांडात साईबाबा संस्थानच्या दोन कर्मचार्‍यांचा बळी गेला तर अत्यवस्थ असलेल्या एका ग्रामस्थावर प्रवरानगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेतील मयत सुभाष साहेबराव घोडे, वय 40 रा. करडोबानगर, विमानतळ रोड हे मंदिरातील कायम कर्मचारी ड्युटीवर येत होते तर नितीन कृष्णा शेजुळ, वय 40 रा. शिर्डी-साकुरी शिव रस्ता हे संस्थान मधील कंत्राटी सुरक्षा कर्मचारी ड्युटी संपवून घरी निघाले होते. कृष्णा बाबुराव देहरकर, वय 68 रा.श्रीकृष्णनगर, विमानतळ रोड यांच्यावरही अत्यंत प्राणघातक हल्ला झाला. त्यांची अगोदरच हृदयाची शस्त्रक्रिया झाली आहे. त्यात आता ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर प्रवरानगर येथे उपचार सुरू आहेत. पहाटे चार ते साडेपाच वाजेच्या दरम्यान विमानतळ रोडला या घटना घडल्या.

मोटारसायकलवर असलेल्या दोघांनी चोरीच्या उद्देशाने वेगवेगळ्या ठिकाणी या तिघांना अडवून त्यांच्याकडील रक्कम हिसकावून घेतली. इतक्यावरच न थांबता विकृत मनोवृत्तीतून आरोपींनी या तिघा निरपराध नागरिकांवर चाकूने असंख्य वार केले. यात दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. सीसीटीव्ही मध्ये ही घटना कैद झाली आहे. पोलिस उपअधीक्षक शिरीष वमणे यांच्या पथकाने घटनेनंतर काही तासातच यातील आरोपी किरण सदाफुले रा. गणेशवाडी शिर्डी याचा पाठलाग करून त्याला पकडले तर दुसरा आरोपी राजू आहेर उर्फ शाक्या हा पसार झाला असून पोलिसांची पथके त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, माजी खासदार डॉ. सुजय विखे सकाळपासून शिर्डीत ठाण मांडून होते.

दरम्यान साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी रुग्णालयात येऊन मयताच्या नातेवाईकांची भेट घेतली. याशिवाय शिर्डीचे कैलासबापू कोते, ताराचंद कोते, सचिन चौघुले, शिवाजी गोंदकर, अनिता जगताप, विजय जगताप, सुजीत गोंदकर, सुरेश आरणे आदीनी रुग्णालयात येवून नातेवाईकांची भेट घेतली. अशा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची त्यांनी मागणी केली. या घटनेत मयत झालेल्या व्यक्तींचा मृतदेह आरोपींचा तपास लागेपर्यंत तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई होईपर्यंत ताब्यात घेणार नाही अशी भूमिका त्यांच्या नातेवाईकांनी घेत शिर्डी पोलीस ठाण्या समोर ठिय्या आंदोलन केले.

परंतु डॉ. सुजय विखे पाटील यांनी या ठिकाणी येऊन आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच या घटनेचा तपास करण्यासाठी हलगर्जीपणा करणार्‍या पोलीस कर्मचारी व अधिकारी यांची निलंबनाची मागणी पोलीस अधीक्षक यांच्याकडे करू असे आश्वासन दिल्यानंतर मयत व्यक्तींच्या नातेवाईकांनी या आंदोलन मागे घेतले. शिर्डीत पोलिसांच्या दुर्लक्षितपणामुळे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत असल्याने शिर्डी शहर हे गुन्हेगारीच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे येथील नागरिकांचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून पोलीस निरीक्षक यांचा गुन्हेगारांवर वचक न राहिल्यामुळे गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. या ठिकाणी गुन्हेगारांवर धाक निर्माण करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांची नियुक्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आह

पहाटे राहाता व शिर्डी हद्दीत मोटरसायकलवरील दोघा आरोपींनी तिघांवर वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या चाकू हल्ल्यात दोन ठार तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. एकाला पकडण्यात आले आहे. दुसर्‍याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी घटना घडल्यानंतर काही हलगर्जीपणा केला असेलतर चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. शिर्डीतील बेकायदेशीर व्यवसाय व गुन्हेगारांवर कारवाई सुरूच असते, ती पुढेही सुरू राहील.
– राकेश ओला, पोलिस अधीक्षक

अत्यंत दुर्दैवी घटना असून पंधरा दिवसांत शिर्डीतील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी कठोर उपाययोजना करू. खून झाला असताना पोलिसांनी अपघाताची नोंद केली. ज्या पोलिसाला अपघात व खून यातील फरक कळत नाही त्याला पोलिसांत राहण्याचा अधिकार नाही. त्याच्या निलंबनासाठी पोलीस अधीक्षकांशी बोललो आहे. पोलीस निरीक्षकावरही कारवाई करण्यात येईल. येथील पोलीस व्हीआयपी दर्शन प्रोटोकॉलमध्ये व्यस्त असतात. त्यामुळे प्रोटोकॉलसाठी स्वतंत्र पोलीस देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आग्रह धरून अनेक दिवसांचा हा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात येईल.
– डॉ. सुजय विखे पाटील

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...