Sunday, June 14, 2026
HomeनगरShirdi : शिर्डीत दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

Shirdi : शिर्डीत दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

साई मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

गुरुवारी दत्त जयंती निमित्त साईबाबा समाधी मंदिर (Sai Baba Samadhi Temple) व साई संस्थान परिसरातील दत्त मंदिरात साईभक्त रजनी डांग यांच्या देणगीने आकर्षक व उत्कृष्ट फुलांची सजावट (Flower Decoration) करण्यात आली. दत्त जयंती (Datta Jayanti) निमित्त शिर्डीत विविध जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात पालख्या दाखल झाल्या. संपूर्ण दिवसभर शिर्डी परिसरातील साई भक्तांनी साई समाधी व दत्त मंदिर येथे येऊन दर्शनाचा लाभ घेतला.

- Advertisement -

या उत्सवाचे औचित्य साधून गुरुवारी दत्त जयंती निमित्त शिर्डीतील (Shirdi) साई संस्थान परिसरातील दत्त मंदिर तसेच साई समाधी मंदिर येथे आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट (Flower Decoration) करण्यात आली. साईभक्त रजनी डांग यांच्या देणगीने मंदिर परिसरात विविध प्रकारच्या फुलांची सजावट करण्यात आल्यामुळे ही सजावट भाविकांसाठी आकर्षण ठरली. दत्त जयंती निमित्त सायंकाळी सहा वाजता दत्त मंदिरात दत्त महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त अभिषेक व महाआरती करण्यात आली. तसेच सायंकाळी साईबाबा संस्थानच्या सभामंडपात नाशिक (Nashik) येथील स्नेहल कुलकर्णी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कोल्हापूर (Kolhapur), पुणे (Pune), येवला (Yeola) व इतर परिसरातील शेकडो भाविकांनी पालखीत सहभाग घेऊन शिर्डीत साई समाधीचे दर्शन घेतले. तसेच राहाता, शिर्डी, निघोज, निमगाव, सावळीविहीर व परिसरातील भाविकांनी गुरुवारी शिर्डीतील दत्त मंदिरात येऊन दर्शनाचा लाभ घेतला. दत्त जयंती उत्सव गुरुवारी असल्याने साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी स्थानिक नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली. साईबाबा संस्थान परिसरात भक्तिमय वातावरण दिसून आले.

ताज्या बातम्या

Udaipur Intercity Express accident : मोठी दुर्घटना! आग लागल्याची अफवा पसरल्याने...

0
उदयपूर । Udaipur भय आणि घबराट माणसाकडून काय करून घेईल याचा नेम नसतो, पण कधीकधी हीच घबराट प्राणांतिक ठरते, याचाच एक अत्यंत दुर्दैवी प्रत्यय मध्य...