Tuesday, March 25, 2025
Homeनगरशिर्डी महोत्सवाची तयारी पूर्ण

शिर्डी महोत्सवाची तयारी पूर्ण

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

साईबाबा संस्थानच्या वतीने नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागता निमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवाची तयारी पुर्ण झाली असून यानिमित्ताने 29 डिसेंबर 2024 ते 1 जानेवारी 2025 अखेर 4 दिवस विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थानचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली. श्री. कोळेकर म्हणाले, दरवर्षी नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागता निमित्त श्रींच्या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. संस्थानकडे शिर्डी महोत्सवाकरीता वेगवगळ्या ठिकाणांहुन येणार्‍या 89 पालख्यांनी नोंदणी केलेली आहे. साईभक्तांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेवून मंदिर परिसरात तसेच अतिरिक्त निवास व्यवस्थेसाठी साई धर्मशाळा व भक्तनिवासस्थान 500 रुम या ठिकाणी 34 हजार 500 चौरस फुटाचे मंडप उभारण्यात आलेले आहे.

- Advertisement -

साईभक्तांकरीता सुमारे 120 क्विंटल साखरेचे मोफत बुंदी प्रसाद पाकीटे व सुमारे 400 क्विंटल साखरेचे मोतीचूर लाडू प्रसाद पाकीटे तयार करण्यात आलेले आहे. उत्सव कालावधीत भक्तांना प्रसाद लाडू पॅकेट सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी नविन दर्शन रांग, साईनाथ मंगल कार्यालय, व्दारकामाई समोरील खुले नाट्यगृह, मारुती मंदिराशेजारी साई कॉम्प्लेक्स, गेट नंबर 4 चे आतील बाजू, साई प्रसादालय, सेवाधाम इमारत व सर्व निवासस्थाने आदी ठिकाणी लाडू विक्री केंद्र उभारण्यात आले आहे. आवश्यकता भासल्यास अतिरिक्त लाडू विक्री केंद्र उभारण्याचे नियोजन केले आहे. दर्शन रांग व परिसरात भक्तांना अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे. या कालावधीत भक्तांच्या सोयीसाठी नविन दर्शनरांग, मंदिर परिसर, साईआश्रम व साईप्रसादालय आदि ठिकाणी प्रथमोपचार केंद्राची व्यवस्था करण्यात येणार आहे.

तातडीचे सेवेसाठी मंदिर परिसरात, नविन भक्त निवासस्थान, धर्मशाळा व साईप्रसादालय येथे रुग्णवाहीका तैनात ठेवण्यात येणार आहे. तसेच सुरक्षेकामी पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरिक्षक, पोलिस कर्मचारी, एक शिघ्र कृतीदल पथक, एक बॉम्ब शोधक पथक तैनात असून बंदोबस्तासाठी अतिरिक्त पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलिस निरिक्षक, पुरुष पोलीस कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी तैनात केली. याव्यतिरिक्त संस्थानचे पोलिस निरिक्षक व सुरक्षा कर्मचारी असे एकुण 1000 हून अधिक कर्मचारी कार्यरत राहणार आहे. मंगळवार 31 रोजी समाधी मंदिर साईभक्तांना दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार आहे. नाताळ सुट्टी, चालु वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागता निमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिर्डी महोत्सवा निमित्ताने दिनांक 25 डिसेंबर ते 1 जानेवारी 2025 या कालावधीत विविध कार्यक्रम होणार आहे. जास्तीत-जास्त श्रोत्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. कोळेकर यांनी केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...