Tuesday, September 29, 2026
Homeक्राईमशिर्डीत सराईत आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

शिर्डीत सराईत आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

राहाता |प्रतिनिधी| Rahata

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (LCB) शिर्डी येथे गावठी कट्टा (Shirdi Gavathi Katta) बाळगणारा सराईत आरोपी (Accused Arrested) कट्ट्यासह जेरबंद केला. आरोपीकडून गावठी कट्ट्यासह 70 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. दिनेश आहेर यांनी पोसई तुषार धाकराव, पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, फुरकान शेख, बाळासाहेब नागरगोजे, बाळासाहेब गुंजाळ, प्रमोद जाधव, अमृत आढाव, प्रशांत राठोड, रमीजराजा आत्तार व महादेव भांड यांचे पथक तयार करुन अवैध अग्निशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांची माहिती काढून पथक रवाना केले.

- Advertisement -

पथकाने शुक्रवारी शिर्डी पोलीस ठाण्याच्या (Shirdi Police Station) हद्दीमध्ये अग्निशस्त्र, हत्यारे बाळगणारे इसमांची माहिती काढत असतांना गुप्त बातमीदारामार्फत अमोल सिध्दार्थ दिवे, रा. शिर्डी हा गावठी कट्टा बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने कनकुरी रोड, नांदुर्खी रोडवर हॉटेल राजेजवळ थांबला असल्याची माहिती मिळाली. पथकाने पंचासमक्ष सापळा रचून संशयीत इसमास ताब्यात घेऊन नाव विचारले असता त्याने अमोल सिध्दार्थ दिवे (रा. गोवर्धननगर, शिर्डी) असे असल्याचे सांगितले. त्याच्याकडून 50 हजार रुपये किंमतीचे एक गावठी पिस्टल, 1,500 रुपये किंमतीचे एक जिवंत काडतुस व 20 हार रुपयाचा एक मोबाईल असा एकुण 70 हजाराचा मुद्देमाल जप्त (Seized) करण्यात आला.

आरोपीकडे चौकशी केली असता त्याने अग्नीशस्त्र हे मुजम्मिल हारुन बागवान, रा. श्रीरामपुर याचेकडून खरेदी करुन विक्रीकरिता आणल्याचे सांगितले. या आरोपीविरूध्द शिर्डी पोलीस स्टेशन गुरनं 158/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पहिल्याच दिवशी जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील लाखो शेतकर्‍यांसह दूध उत्पादक, शेती प्रक्रिया प्रकल्प आणि साखर कारखानदारांची बँक म्हणून ओळख असणार्‍या नगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची...