Tuesday, May 5, 2026
Homeक्राईमShirdi : शिर्डीत गावठी कट्ट्यासह राहात्याचा तरुण जेरबंद

Shirdi : शिर्डीत गावठी कट्ट्यासह राहात्याचा तरुण जेरबंद

आरोपीचे नागपूर कनेक्शन उघड

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

शिर्डी परिसरात पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे धाडसी कारवाई करत एका तरुणाला गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह रंगेहाथ अटक केली. 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी एक हजार रूम मागील मोकळ्या मैदानात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खबरीने दिलेल्या माहितीनुसार आणि तात्काळ सापळा लावण्यात आला.

- Advertisement -

स्प्लेंडर मोटारसायकल एमएच 17, डि बी 0523 वर एक इसम गावठी कट्टा विक्रीसाठी येणार आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार पथकाने पंचांसह सापळा रचला. ठरलेल्या ठिकाणी संशयित येताच पोलिसांनी वेढा घालून त्याला पकडले. झडतीदरम्यान आरोपीच्या कमरेला मॅगझीनसह देशी बनावटीचा गावठी कट्टा आढळून आला. अंदाजे किंमत 25,000 रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आरोपीकडे कोणताही अग्निशस्त्र परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. जप्त शस्त्र पंचांसमक्ष सील करून ताब्यात घेण्यात आले. आरोपीची ओळख; नागपूर कनेक्शनचा धागा असून अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव ओमकार शिरसाठ (वय 23, रा. राहाता) असे आहे.

चौकशीत त्याने हे शस्त्र सुर्या नावाच्या नागपूर येथील व्यक्तीस विक्रीसाठी आणल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली आहे. दुसर्‍या संशयिताचा शोध सुरू आहे.या प्रकरणी आरोपींविरुद्ध आर्म अ‍ॅक्ट 1959 (सुधारणा 2019) कलम 3/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे. शिर्डी परिसरात बेकायदेशीर शस्त्र बाळगणे व विक्री करण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर पोलिसांनी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. सुरक्षित धार्मिक शहराची ओळख असलेल्या शिर्डीत अशा प्रकारच्या गुन्हेगारी हालचालींवर पोलिसांची बारीक नजर असून, पुढील काळातही अशाच धडक मोहिमा सुरू राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.कायद्याच्या विरोधात शस्त्र उचलणार्‍यांना थेट जेलची हवा दाखवण्यात येईल असे पोलीस निरीक्षक रंणजीत गलांडे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 771 ग्रामपंचायतींच्या आरक्षणाकडे नजरा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील जानेवारी ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणार्‍या 771 ग्रामपंचायतींची प्रभाग रचना कार्यक्रम फेबु्रवारी महिन्यांत जाहीर करण्यात आला होता. या प्रभाग...