Saturday, September 12, 2026
Homeक्राईमShirdi : शिर्डीतून चोरी झालेले अडीच कोटीचे अडीच किलो सोने जप्त

Shirdi : शिर्डीतून चोरी झालेले अडीच कोटीचे अडीच किलो सोने जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

राहाता |प्रतिनिधी| Rahata

होलसेल सोने व्यवसाय असलेले व्यापारी विजयसिंह वसनाजी खिशी, रा.आवाल घुमटी, ता.अमिरगढ, जि. बनासकाटा, गुजरात हे शिर्डी, श्रीरामपूर, कोल्हार, सोनई व अहिल्यानगर येथील सराफ व्यावसायिकांकडे सोने विक्रीसाठी आले असता त्यांच्या ड्रायव्हरनेच 3 कोटी 26 लाख रुपये किंमतीचे दागिने चोरुन नेले होते. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा समांतर तपास करुन आरोपीकडून अडीच कोटी रुपये किंमतीचे अडीच किलो सोन्याचे दागिने जप्त केले आहे.

- Advertisement -

घडलेल्या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेस सोने चोरीच्या गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना दिल्या. त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोसई तुषार धाकराव व पोलीस अंमलदार बापूसाहेब फोलाणे, संतोष लोढे, अरूण गांगुर्डे, किशोर शिरसाठ, अमृत आढाव, फुरकान शेख, प्रशांत राठोड व चंद्रकांत कुसळकर अशांचे पथक नेमून चोरीचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत सूचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.

तपास पथकाने घटना ठिकाणी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्यातील निष्पन्न आरोपीचा पुणे, मुंबई येथे शोध घेतला. परंतू आरोपी त्याच्या मुळ गावी इब्रेकाताला, ता. चोहटन, जि. बारमेर, राजस्थान येथे गेल्याचे निष्पन्न झाले. पथकाने राजस्थान येथे जाऊन सुरेशकुमार भुरसिंह राजपुरोहित याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही. पथकाने आरोपीच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन गुन्ह्याचे गांभीर्य समजावून सांगुन आरोपी व गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत काही माहिती प्राप्त झाल्यास कळविणेबाबत सांगितले.

त्यानंतर आरोपीचा भाऊ रमेशकुमार भुरसिंह राजपुराहित हा स्थानिक गुन्हे शाखेत हजर होऊन त्याने गुन्ह्यातील मुद्देमाल हजर करत असल्याबाबत कळविले. पथकाने पंचासमक्ष त्याच्याकडे विचारपूस केली असता आरोपी सुरेशकुमार भुरसिंह राजपुरोहित याने शिर्डी येथून चोरून आणलेले सोन्याचे दागीने बॅगमधून आणून घरी ठेवले व तो कोठेतरी निघुन गेल्याची माहिती दिली. पंचासमक्ष रमेशकुमार भुरसिंह राजपुराहित याने हजर केलेले 2 कोटी 50 लाख 59 हजार 103 रूपये किंमतीचे 2687.361 ग्रॅम वजनाचे सोन्याचे विविध प्रकारचे दागीने जप्त केले.

गुन्ह्याचे तपासकामी जप्त करण्यात आलेला मुद्देमाल शिर्डी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन हे करीत आहेत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.

ताज्या बातम्या

BRICS

BRICS Summit 2026:’आम्ही कोणाच्याही विरोधात नाही’ BRICS परिषदेतून PM मोदींचा संदेश,...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित BRICS शिखर परिषदेत सहभागी झालेल्या परदेशी प्रतिनिधींचे स्वागत...