Friday, May 3, 2024
Homeनगरशिर्डीत महामार्गावरील खड्ड्याच्या दुरुस्तीसाठी लहुजी सेना करणार जागरण गोंधळ

शिर्डीत महामार्गावरील खड्ड्याच्या दुरुस्तीसाठी लहुजी सेना करणार जागरण गोंधळ

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

नगर मनमाड रोडवरील हॉटेल बंधन समोर असलेल्या महामार्गावर काही दिवसांपूर्वी फार मोठा खडा पडला आहे. या खड्ड्याची त्वरित दुरुस्ती न केल्यास आज सोमवारी लहुजी सेनेच्यावतीने जागरण गोंधळ या मार्गाने आंदोलन केले जाणार आहे.

- Advertisement -

शिर्डी प्रांत कार्यालयाला लहुजी सेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या महामार्गावरून अनेक साईभक्त, शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ प्रवास करत आहे. जड वाहतूकही याच मार्गाने होते. खड्डा चुकवीत असताना अनेक गाड्याचे टायर फुटण्याचे प्रमाण तर शालेय विद्यार्थी, साईभक्त, दुचाकीवरून प्रवास करत असताना भल्या मोठ्या खड्ड्याला चुकविताना अपघाताला सामोरे जात आहे. हे सर्व घडत असतानाही संबंधित विभाग, शिर्डी नगरपंचायत, साई संस्थान, प्रांत कार्यालय, शिर्डी वाहतूक पोलीस हे या घटनेची दखल घेत नाही.

रात्री अपरात्री या खड्ड्यामुळे मोठा अपघात झाला व निष्पाप लोकांचा बळी गेला तर याला वाली कोण? असा प्रश्न उपस्थित करून संबंधित विभागाला जाग येण्यासाठी व साईभक्त, शिर्डीकरांना अपघातापासून वाचविण्यासाठी न्याय मिळावा या हेतूने शिर्डी प्रांत कार्यालयाला लेखी निवेदन दोन दिवसांपूर्वी दिले होते. अद्याप दखल न घेतल्याने लहुजी सेना सामाजिक संघटना इतर अनेक सामाजिक संघटनेच्यावतीने आज सोमवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी लोकशाही मार्गाने सदर खड्ड्याच्या ठिकाणी संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यासाठी जागरण गोंधळ या मार्गाने आंदोलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष समीर वीर, राज्य सरचिटणीस रामभाऊ पिंगळे, जिल्हा युवा अध्यक्ष भाऊसाहेब आव्हाड, जिल्हाध्यक्ष मंजाबापू साळवे यांनी दिली आहे.

या निवेदनावर समीर वीर, रुपेश आरणे, परशुराम साळवे, संतोष भडकवाड, नंदू आरणे आदी प्रमुख पदाधिकार्‍यांची नावे आहेत. सदर निवेदनाच्या प्रति मुख्याधिकारी नगरपंचायत, प्रांताधिकारी शिर्डी, पोलीस स्टेशन, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींना पाठविण्यात आल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या