Monday, October 26, 2026
Homeक्राईमShirdi : शिर्डीतील हॉटेल क्रांती येथे सुरू असणार्‍या वेश्या व्यवसायावर छापा

Shirdi : शिर्डीतील हॉटेल क्रांती येथे सुरू असणार्‍या वेश्या व्यवसायावर छापा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शिर्डी शहरातील हॉटेल क्रांती या हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती काल मिळाली होती. त्यानुसार श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी येथील वाचक पोलीस उपनिरीक्षक खोंडे यांना सदर प्रकरणी पडताळणी करून सत्यता असल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते.

- Advertisement -

त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक खोंडे यांनी बोगस ग्राहक पाठवून वेश्या व्यवसायासंबंधाने खात्री केली असता सदर हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याबाबतची खात्री पटली. त्या अनुषंगाने सविस्तर पंचनामा करण्यात आला. सदर हॉटेलमध्ये दोन पिडित महिला मिळून आल्या असून सदर पीडित महिलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना निवारागृहात पाठवण्यात आले आहे.

वेश्या व्यवसायावर उपजीविका करणारे हॉटेल चालक व मालक यांच्या विरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम 3,4,5,7,8 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. घटनास्थळावरून सुमारे 32 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे हे करत आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्र

मतदार यादीतून कोट्यवधी नावे वगळल्याचा आरोप; महाराष्ट्र सरकार आणि निवडणूक आयोगाला...

0
नवी दिल्ली | New Delhiमहाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून (SIR) सुरू असलेला वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. या प्रक्रियेदरम्यान मोठ्या संख्येने मतदारांची...