शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
शहरात अवैधरित्या एका हॉटेलात चालणार्या वेश्या व्यवसायावर (Prostitute Business) उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती व शिर्डी पोलीस स्टेशनचे (Shirdi Police Station) पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या पथकाने छापा (Police Raid) टाकून कारवाई केली. यात एक पिडीत महिला व एक अल्पवयीन मुलीची सुटका केली असून हॉटेल मालक व एजंट महिले विरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंध व बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
शिर्डी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना गुप्त खबर्यामार्फत शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रिंगरोड, शिवाजीनगर येथे हॉटेल पवनधाम मध्ये एक महिला व एक इसम महिलां करवी वेश्याव्यवसाय चालवित आहे. पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, सहा. पोलीस निरीक्षक महेश येसेकर, पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, पो. हे. कॉ. इरफान शेख, अशोक शिंदे, संदिप उदावंत, दातीर, संतोष गोमसाळे, पोना शेकडे, मपोकॉ सुनिता पवार व अंमलदार यांना बातमीबाबत माहिती देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पथकाने हॉटेल पवनधाम (Hotel Pawandham) येथे 11 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास पंच व बनावट ग्राहकासह जाऊन छापा (Raid) टाकला असता तेथे हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर एक पिडीत महिला व एक अल्पवयीन मुलगी मिळून आली.
त्यांची तात्काळ सुटका करण्यात आली. तसेच हॉटेलचे मालक गोविंद लिलाराम गरुड (रा. शिर्डी, गणेशवाडी) येथे राहणारी महिला व एजंट यांनी पिडीत महिला व अल्पवयीन मुलगी यांना पुरुष ग्राहकाबरोबर शरीरसंबंध करण्यासाठी हॉटेल पवनधाम उपलब्ध करून वेश्याव्यवसाय चालवून त्यावर आपली उपजिविका करतांना मुद्देमालासह मिळून आले. म्हणून हॉटेल मालक व एजंटा विरुद्ध गु. रजि. नं. 108/2026 अनैतिक व्यापार प्रतिबंध अधि. 1956 चे कलम 3,4,5,7,8 सह बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 12, 17 प्रमाणे शिर्डी पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेल मालक व एजंट महिला यांना अटक (Arrested0 करण्यात आली आहे.





