Saturday, May 25, 2024
Homeनगरशिर्डी-कोपरगाव परिसरात बनावट देशी दारु विक्री

शिर्डी-कोपरगाव परिसरात बनावट देशी दारु विक्री

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

शिर्डी आणि कोपरगाव परीसरात बनावट देशी दारु विक्री करणार्‍यावर राज्य उत्पादन शुल्क कोपरगाव विभागाने धडक कारवाई करत दोन जणांविरुद्ध कारवाई केली असून एकाला ताब्यात घेतले तर एक आरोपी फरार आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी, 11 ऑगस्ट रोजी राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकार्‍यांना गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, वावी- राहाता रोड, वेसगांव शिवार, ता. कोपरगांव या ठिकाणी हॉटेल जयमल्हारमध्ये बनावट देशी दारूची विक्री केली जात आहे. यावेळी दारुबंदी गुन्हयाखाली छापा ठाकला असता आरोपी जालिंदर गोरक्षनाथ चितळकर रा. सोयगांव, ता. कोपरगांव या इसमाकडे अवैद्य देशी व विदेशी मद्य मिळून आले. मिळुन आलेल्या देशी दारू 180 मि.ली. क्षमतेच्या बाटल्या बनावट असल्याचे मिळून आले आहे. विदेशी दारुचे 1.5 बॉक्स व देशी दारु भिंगरी संत्राच्या 180 मिली क्षमतेच्या 4 बॉक्स तसेच एक मोबाईल असे एकुण 49 हजार 220 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सदर बनावट देशी मद्याबाबत तपास केला असता भाऊसाहेब साहेबराव जगताप याचे कडुन प्राप्त झाले असे समजले. अटक आरोपी व फरार आरोपी भाउसाहेब साहेबराव जगताप विरुध्द महाराष्ट्र दारुबंधी कायदा 1949 चे कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. न्यायालयाने आरोपीला 25 ऑगस्ट 2023 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. बनावट देशी दारु उपलब्ध करुन ढाबे व टपर्‍यावरती विक्री करणारा मुख्य सुत्रधार भाउसाहेब साहेबराव जगताप हा फरार आहे. त्याचा शोध राज्य उत्पादन शुल्क, कोपरगाव विभाग व भरारी पथक श्रीरामपुर द्वारे घेण्यात येत आहेत.

शिर्डी व शिर्डी परीसरातील सर्व नागरीकांना राज्य उत्पादन शुल्क विभागा मार्फत निवेदन करण्यात येते की, भाऊसाहेब साहेबराव जगताप हा इसम शिर्डी व शिर्डी परीसरात बनावट देशी दारुची विक्री करत आहे. तरी नागरीकांनी मद्य खरेदी करताना शासन मान्य दारु दुकानामधुनच खरेदी करावे. जेणेकरुन बनावट मद्य प्राशन करुन जिवित हानी होणार नाही व बनावट मद्यविक्रीला आळा बसेल.दरम्यान गुन्हयाचा तपास दुय्यम निरिक्षक एस. पी. जाधव करीत आहे.

सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक प्रमोद सोनोने, उपाधीक्षक सुजीत पाटील, कोपरगाव निरिक्षक एस.एस. हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक एस. आर. शेलार, जी. एन. नायकोडी दुय्यम निरिक्षक, व्ही. एम. आभाळे, भाउसाहेब भोर, खलील शेख, नारायण ठुबे, सुधीर नागरे, सचिन बटूळे, अमीन सय्यद, वर्षा जाधव, वाहन चालक विजय पाटोळे यांच्या पथकाने केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या