Saturday, May 30, 2026
HomeनगरAshok Kharat : शिर्डीतील जमीन व्यवहारांसंदर्भात साक्षीदारांची समोरासमोर चौकशी

Ashok Kharat : शिर्डीतील जमीन व्यवहारांसंदर्भात साक्षीदारांची समोरासमोर चौकशी

शिर्डी (प्रतिनिधी)

- Advertisement -

शिर्डीतील बहुचर्चित जमीन खरेदी व्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या अशोक खरात याची शिर्डी पोलिसांकडून मागील पाच दिवसांपासून विविध कागदपत्रे, आर्थिक व्यवहार आणि संबंधित व्यक्तींचे जबाब यांची सखोल पडताळणी करत असून प्रकरणातील अनेक बाबींवर बारकाईने छाननी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

शनिवारी खरातची पोलीस कोठडी संपुष्टात येत असल्याने त्याला पुढील पोलिस कोठडी द्यायची की न्यायालयीन कोठडीत पाठवायचे, यावर आज न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तपासादरम्यान पोलिसांनी जमीन व्यवहाराशी संबंधित काही प्रमुख साक्षीदारांना समोरासमोर बसवून चौकशी केली. त्यात सचिन वाणी, प्रभाकर गुंजाळ, भाऊसाहेब चौधरी तसेच जमीनमालक रावसाहेब गोंदकर यांचे जबाब नोंदविण्यात आले. व्यवहारातील पैशांची देवाणघेवाण, कराराची प्रक्रिया, दस्तऐवजांची देवाणघेवाण आणि संबंधित व्यक्तींची भूमिका याबाबत तपास अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती घेतल्याचे समजते.

सूत्रांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान समोरासमोर प्रश्नोत्तर सुरू असताना खरातने साक्षीदारांवर नाराजी व्यक्त करत, मला मुद्दाम या प्रकरणात अडकवले जात आहे, असा आरोप करित चिडचीड केल्याचे समजते. दरम्यान, खरातने तपास अधिकाऱ्यांसमोर आपली बाजू मांडताना संबंधित जमीन व्यवहार कायदेशीर मार्गान झाल्याचा दावा कायम ठेवला आहे. सर्व आर्थिक व्यवहार बँक व्यवहारांद्वारे झाल्याचे सांगत फसवणूक किंवा बेकायदेशीर सावकारकीचे आरोप त्याने फेटाळल्याची माहिती समोर आली आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : नाेकराने लुटले मालकिणीचे घर; साडेतीन लाखांचे दागिने...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik घरकाम करणाऱ्यांवर दाखवलेला अतिविश्वास पुन्हा एकदा महागात पडल्याची घटना नाशिकमधील (Nashik) उच्चभ्रू परिसर समजल्या जाणाऱ्या गंगापूर रोडवर (Gangapur Road) उघडकीस...